वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टायर बनविणारी कंपनी ‘एमआरएफ’चे समभाग हे देशातील सर्वात महाग समभाग आहेत. याची सध्याची किमत ही 70,000 रुपयाच्या जवळपास आहे. यामुळे यामध्ये सर्वसामान्यांना यामध्ये गुंतवणूक करता येत नाही. परंतु लवकरच आता 100 रुपयांपर्यंतही एमआरएफचे समभाग खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
याचे कारण म्हणजे सरकार आता अमेरिकेच्या धर्तीवर भारतामध्ये प्रॅक्शनल शेअर्स(fractional shares)साठी आरखडा तयार करण्याची योजना बनविण्यावर काम करत आहे. अशा स्थितीत कोणत्याही गुंतवणूकदारांना कंपनीचे कमीत कमी एक समभाग ट्रेडिंग किमतीवर खरेदी करता येणार आहे. ही व्यवस्था येणाऱया दिवसांमध्ये बदलणार आहे.
प्रॅक्शनल समभागाची व्यवस्था आल्यानंतर गुंतवणूकदारांना 100 रुपये म्हणजे 1,000 रुपयांपर्यंत याचा एक हिस्सा खरेदी करता येऊ शकतो. समभागांच्या किमतीमध्ये तेजीचे एक मुख्य कारण असे आहे, की बाजारामध्ये त्याचा पुरवठा कमी होतो. देशात वर्षांमध्ये इक्विटी इनवेस्टमेंटमध्ये तेजी आली आहे. परंतु भारतीयांना एकूण गुंतवणुकीमध्ये इक्विटीमधील हिस्सेदारी पाच टक्क्यांनी कमी आहे.