दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची गर्दी होत असते. त्यामुळे मध्य रेल्वेनं ७४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचे आरक्षण उद्या दि. ०५ जुलै पासून सुरू होणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.
दरम्यान, यामध्ये सीएसएमटी, पनवेल, नागपूर, पुणे स्थानकातून करमाळी, सावंतवाडी आणि मडगाव या स्थानकांसाठी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.