Tarun Bharat

पाच मिनिटांत 740 विद्यार्थ्यांनी लिहिली भगवदगीता : इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

कराड प्रतिनिधी

शिक्षण मंडळ, कराड संचालित संस्कृतिका विभागामार्फत प्रतिवर्षी कै. अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय भगवद्गीता पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी शताब्दी निमित्त शिक्षण मंडळ कराडच्यावतीने पाच मिनिटात हस्तलिखित भगवद्गीता हा राष्ट्रीय विक्रम शनिवारी येथील टिळक हायस्कूलच्या प्रांगणात पार पडला. संस्थेच्या चार माध्यमिक शाळातील ७४० विद्यार्थी सहभागी झाले होते.संस्थेने हा अभिनव उपक्रम स्व. अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मृतीस समर्पित केलेला आहे. त्यांनी सुमारे 70 वर्ष शाळेत भगवद्गीता शिकवली होती. त्यामुळे त्यांच्या स्मृती निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे शिक्षक गेले काही महिने परिश्रम घेत होते. ३ डिसेंबर मोक्षदा एकादशी अर्थात गीता जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन केले होते. शिक्षण मंडळ, कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे, जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र लाटकर यांच्यासह मान्यवर व पालक उपस्थित होते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी अशोक अडक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिक्षण मंडळ कराडच्या पदाधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Related Stories

यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठीशी अभेद्य उभा करू

Patil_p

निलेश फाळके यांची राज्यमंत्री यड्रावकर यांचे विशेष कार्य अधिकारीपदी नियुक्ती

datta jadhav

पाडळी ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप नाही- दत्तात्रेय ढाणे

Archana Banage

सातारा : मुक्तीचा आकडा झपाट्याने वाढतोय, हजारो बेड रिक्त तर काही सेंटरही रुग्णमुक्त

Archana Banage

सातारा : वाईतील कृष्णामाईच्या उत्सवास सुरुवात

datta jadhav

शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने आनंदीआनंद

datta jadhav