Tarun Bharat

चंदगडच्या तरुणाकडून 74 हजारांच्या बनावट नोटा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

प्रतिनिधी/कोल्हापूर

बनावट नोटा बाळगणाऱया चंदगडच्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली करून त्याच्याकडून 500 रूपयांच्या एकूण 74 हजार रूपये किंमतीच्या 148 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. प्रमोद पुंडलीक मुळीक (वय 31 रा. मजरे शिरगांव, ता. चंदगड) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार ओंकार परब यांना प्रमोद मुळीक हा बनावट नोटा घेऊन शिवाजी पार्क येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, अमंलदार सुनिल कवळेकर, ओंकार परब, अमोल कोळेकर, अजय वाडेकर, वसंत पिंगळे, संदीप कुंभार, नितीन चोथे, तुकाराम राजीगरे, सागर कांडगांवे व अनिल जाधव यांच्या पथकाने शिवाजी पार्क परिसरात सापळा लावला होता. यावेळी प्रमोद मुळीक शिवाजी पार्कात आला असता पथकाने त्याला ताब्यात घेत 148 बनावट नोटा जप्त केल्या. शाहुपूरी पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली आहे.

बनावट नोटांचे धागेदोरे शोधणार

प्रमोद मुळीक हा कोणतेही काम करत नाही. त्याची पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरु आहे. या बनावट नोटांची छपाई कोठे होते. यामागे आणखी कोणी आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात 17 पॉझिटिव्ह, कोरोनाचा चौथा बळी

Abhijeet Shinde

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातून कोरोना रुग्णाचे पलायन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मोटर सायकलची टेम्पोला समोरासमोर धडक ; एक ठार

Abhijeet Shinde

पेठ वडगावच्या महालक्ष्मी जनावर बाजारात साडेपाच कोटींची उलाढाल

Abhijeet Shinde

अ. भा. सॉफ्टबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाला कांस्य

Sumit Tambekar

कोल्हापूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!