Tarun Bharat

75 कोटी सूर्यनमस्काराचा विक्रम करण्याचे धेय्य

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

आझादीका अमृत महोत्सव या प्रकल्पाअंतर्गत येत्या 1 जानेवारी 2022 पासून 21 दिवसांत एकूण 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा जागतिक विक्रम करण्याचे ध्येय देशातील पाच संस्थांनी केला आहे. गोव्यात साधारण एक लाख लोक रोज 13 सूर्यनमस्कार घालणार, अशी माहिती या अभियानचे संयोजक प्रा. दीपक आमोणकर यांनी †िदली.

यावेळी हार्टफ्tढलनेस या संस्थेचे दत्तप्रसाद भोसले, पतंजली योग समितीच्यावतीने तुळ†िशदास मंगेशकर, योगासना स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने संदेश बाराजणकर  तर गीता परिवारच्यावतीने ईश्वर कुबल यावेळी उपस्थित होते.

अखिल भारतीय पातळीवर ही मोहीम राबवली जात असून सुमारे 30 लाख विद्यार्थी व  योगपेमी यात सहभागी होणार आहेत. गोव्यातून किमान एक लाख लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा दीपक आमोणकर यांनी व्यक्त केली आहे.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी (www.75suryanamaskar.com) या संकेतस्थळावरून नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यक्तिगत किंवा संस्थेतफ्xढ सहभागी होता येते. तसेच स्वयंसेवक म्हणून नोंदणीकृत होतो येते, अशी माहिती आमोणकर यांनी दिली.

दि. 1 ते 21 जानेवारी 2022 असे 21 दिवस ही मोहिम चालणार आहे. रोज किमान 13 सूर्यनमस्कार घालून संकेतस्थळावर त्याची नोंद करणे आवश्यक आहे. सहभाग यशस्वी झाल्यास प्रत्येकाला प्रतिज्ञापत्र पाठवले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

21 दिवसांत 75 कोटी सूर्यनमस्कार घालणे हा जागतिक विक्रम ठरणार आहे. त्यात क्रीडा खाते व शिक्षण खात्याची मदत घेण्यात आली असून सर्व शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये व कॉलेजना निरोप देण्यात आला आहे. संस्थांनाही संदेश पाठवण्यात आले आहेत. या मोहिमेत लोकांनी उत्स्फ्tढर्तपणे सहभागी होणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी दीपक आमोणकर – 9422389903 वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

मुलीनेच केला वडिलांचा खून

Amit Kulkarni

ढवळी येथे बिबटय़ा घुसला घरात..!

Patil_p

राज्यातील अंमलीपदार्थ विरोधी न्यायालयाला न्यायमूर्तीच नाही

Patil_p

आडपईतील गणपती विसर्जन जल्लोषाविना

Patil_p

राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या दोषींवर गुन्हे दाखल करा

Patil_p

मर्जीनुसार न वागणाऱया अधिकाऱयांचे खच्चिकरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!