Tarun Bharat

75 टक्के बाधितांमध्ये आढळला डेल्टा व्हेरिएंट

मागील चार आठवडय़ातील स्थिती : ‘डब्ल्यूएचओ’ची माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारत, चीन, रशिया, इस्त्राईल आणि ब्रिटनसह जगातील बऱयाच देशांमध्ये गेल्या चार आठवडय़ांत सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 75 टक्केपेक्षा जास्त बाधित डेल्टा व्हेरिएंटचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या अहवालात यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. तसेच सदर देशांमध्ये संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे.

गेल्या आठवडय़ात इंडोनेशियामध्ये (3,50,273 नवीन प्रकरणे; 44 टक्के वाढ), ब्रिटन (2,96,447 नवीन प्रकरणे; 41 टक्के वाढ), ब्राझील (2,87,610 नवीन प्रकरणे, 14 टक्के घट), भारत (2,68,843 नवीन प्रकरणे; 8 टक्क्मयांनी घट) आणि अमेरिका (2,16,433 नवीन प्रकरणे; 68 टक्क्मयांनी वाढ) अशी कोरोनास्थिती दिसून आली आहे. यापैकी बहुतांश नव्या बाधितांमध्ये डेल्टा व्हेरिएंट  आढळून आला आहे. तसेच काही बाधितांमध्ये अल्फा आणि बीटा व्हेरिएंटही दिसून आले आहेत. जागतिक पातळीवर सध्या 180 देशांमध्ये अल्फा आणि 130 देशांमध्ये बीटा व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. तसेच 78 देशांमध्ये गॅमा आणि 124 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण असल्याची माहिती डब्ल्यूएचओने जारी केली आहे. डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीसाठी हॉस्पिटलायझेशन, आयसीयू प्रवेश आणि मृत्यूचा धोका अधिक आहे.

Related Stories

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिवपदी अपूर्व चंद्र

Tousif Mujawar

दिल्लीत एकाचा मृत्यू, 197 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

भ्रष्ट 15 अधिकाऱयांवर छापे

Patil_p

गुजरातमध्ये कलम ३७० च्या नावाने भरणार क्रिकेट टुर्नामेंट

Archana Banage

झाशी रेल्वेस्थानकाला राणी लक्ष्मीबाईंचे नाव?

Patil_p

1,526 कोटींचे ड्रग्ज जप्त

Patil_p