Tarun Bharat

७५ वा स्वातंत्र्यदिन, ७५ दिवस नागरिकांना मोफत बूस्टर डोस

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशात कोरोना नवीन कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना केंद्र सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.१५ जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या ७५ दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस (Booster Dose) मोफत दिले जाणार आहेत. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत १ टक्क्यांहून कमी लोकांना मिळाला आहे बूस्टर डोस
देशात १८ ते ५९ वयोगटातील ७७ कोटी लोकांना खबरदारीचा डोस द्यायचा आहे. त्यापैकी १ टक्‍क्‍यांहून कमी लोकांना आतापर्यंत खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. तथापि, ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे १६० दशलक्ष पात्र लोकसंख्येपैकी सुमारे २६ टक्के तसेच आरोग्यसेवा आणि अग्रभागी कामगारांना बूस्टर डोस मिळाला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

हे हा वाचा : Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर; हंगामी पंतप्रधानांची घोषणा

Related Stories

पूल टेस्टिंगला अनुमती, अत्यंत कमी खर्च

Patil_p

विरोधी पक्ष माफियांसोबत : योगी

Patil_p

सक्रिय रुग्णसंख्या 2 लाखांवर

datta jadhav

ओमप्रकाश चौटालांना 4 वर्षांचा तुरुंगवास

Patil_p

दिल्लीत वीकेंड कर्फ्यू जाहीर

Patil_p

चिंताजनक : दिल्लीत 8,593 नवे कोरोना रुग्ण; 85 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!