Tarun Bharat

राज्यात अमृतमहोत्सवी वर्षात 75 उद्योग येणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : उद्योग मेळाव्याच्या बोधचिन्हाचे अनावरण

प्रतिनिधी / पणजी

गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या ‘गुंतवणूक करा 2022’ या मोहिमेंतर्गत राज्यात आझादी का अमृतमहोत्सवी वर्षात 75 उद्योग येणार असल्याची खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. 7 ऑक्टोबर रोजी त्यासाठी आयोजित केलेला उद्योजक मेळावा यशस्वी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी गोवा सरकार पूर्णपणे सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

गोवा कॉमर्स चेंबर्सच्या पणजीतील सुरेंद्रबाबू तिंबलो सभागृहात डॉ. सावंत यांच्याहस्ते त्या मेळाव्याच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. डॉ. सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले की, सक्षम विकासात गोवा राज्याने चांगली प्रगती केली असून मानांकन 7 वरून 4 वर आले आहे. हरित उद्योगावर भर देण्यात येणार असून आयटी उद्योगांना प्राधान्य मिळणार आहे.

गोव्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण

गोवा उद्योगांसाठी सर्व प्रकारच्या मार्गाने जोडलेले असून आता मोपा विमानतळामुळे तर राज्य, देशातील प्रमुख लॉजिस्टीक हब होणार असल्याचा दावा त्यांनी केला. सागरमाला, भारतमाला तसेच गती शक्ती अशा विविध प्रकल्पांमुळे गोव्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून त्याचा लाभ उद्योजकांना होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘गुंतवणूक करा 2022’ या मोहिमेचे प्रमुख मांगिरीश पै रायकर यांनी थोडक्यात त्या उपक्रमाची माहिती दिली. त्याअंतर्गत राज्यात आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने चालू वर्षात 75 उद्योग आणण्याचे ध्येय असल्याचे ते म्हणाले. ‘स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेतून ते साकार होईल, अशी खात्री रायकर यांनी प्रकट केली. येत्या 7 ऑक्टोबर रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून तो यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Stories

बोडगेश्वराला आज सोन्याचा दंड अर्पण करणार

Amit Kulkarni

विनायक खेडेकर, संजीव वेरेकर, उदय म्हांबरे यांचा 23 रोजी सत्कार

Amit Kulkarni

तरुणांनी सैन्यात भरती व्हावे

Patil_p

स्व. रावराजे जितेंद्र देशप्रभू यांच्या स्मृती प्रित्यर्थ व्हायकाउंट हायस्कूल येथे रक्तदान शिबिर

Amit Kulkarni

डिचोली बाजारात ग्राहकांच्या सोयीसाठी चोख बंदोबस्त

Patil_p

सत्तरीत कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा निरिक्षकांकडून आढावा

Omkar B