Tarun Bharat

आचरा समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांच्या ७५ पिल्लांना सोडले

आचरा / प्रतिनिधी

75 Olive Ridley turtle hatchlings released into Achara Sea

आचरा समुद्रकिनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी सुर्यकांत आबा धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत मंगळवारी ५१ दिवसानी त्या अंड्यांपासुन बाहेर पडलेल्या ७५ पिल्लांना समुद्रात सोडले आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती.यावेळी वनविभागाचे संजू जाधव, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, शरद धुरी, अजय कोयंडे, जीतेंद्र धुरी, ममता मुळेकर, गणधाली धुरी, गायत्री वाडेकर, स्वप्नील जोशी, नंदू तळवडकर, शुभ्रा धुरी, तृप्ती धुरी, सृष्टी धुरी, चंदना धुरी पिरावाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

कसवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वी समुद्र किनारी संरक्षित करुन ठेवण्यात आली होती. बुधवारी सकाळ पासूनच संरक्षित अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली होती.  आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होतात.

अॕलिव्ह  रिडले ह्या कासव जमातीची कासवे या किनाऱ्यास पसंती देताना दिसत आहेत. तळाशील ते आचरा  कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ ही अंडी न पळवता जतन करत अन्य हिंस्त्र प्राण्यां पासून त्यांचे जतन करत दोन महिन्यानंतर पिल्ले बाहेर पडली की वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडण्यात आली आहेत.

Related Stories

रेपो रेट जैसे थे!

datta jadhav

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

Archana Banage

महेंद्र झापडेकर यांच्यासह पाचजणांविरूद्ध उच्च न्यायालयात अपील ?

Patil_p

सरकार कडून ‘आरोग्य सेतू’ ॲप लॉन्च

prashant_c

दिल्लीत टोळधाडीचा धोका; हाय अलर्ट जारी

datta jadhav

शोपियां चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav