प्रतिनिधी / बेळगाव :
हृदयाला रक्तपुरवठा करणार्या महा रोहिणीची निष्किय झालेली झडप (टावी-कॅरोटीड आर्टरी) बदलण्यात अरिहंत हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. अत्यंत गुंतागुंतीची कर्नाटकतील पहिली आणि भारतातील दुसरी कॅरोटीड आर्टरी (टावी) शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे प्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दिक्षित आणि त्यांचे सहकारी डॉ. अनमोल सोनवे, डॉ. प्रभु हलकट्टी यांनी केली आहे.
‘टावी’ म्हणजेच ट्रान्सकॅथेटर ॲरोटीक वॉल्व इम्प्लांटेशन ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांची खराब झालेली महारोहिणीची झडप बदलण्यास मदत होते. येथील अरिहंत हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.एम.डी. दिक्षित, यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार करणे शक्य झाले आहे.
सामान्यपणे ही प्रक्रिया पायाच्या धमनी (ग्रोईन वेसेल्स) द्वारे केली जाते. परंतु महिलेच्या पायाच्या धमन्या खूपच लहान होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी कॅरोटीड आर्टरी (मेंदूला रक्तपुरवठा करणारी वाहिनी) द्वारे शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारला. या शस्रक्रियेसाठी 75 वय असून कोणतेही दडपण न घेता योग्य तो प्रतिसाद दिला. दरम्यान आजपर्यंत अशाप्रकारची भारतात कॅरोटीड आर्टरी (मेंदूला रक्तपुरवठा करणारी वाहिनी) द्वारे एकच शस्रक्रिया झाली होती. आता दुसरी शस्रक्रिया अरिहंत हॉस्पिटलमध्ये पार पडली आहे. विशेष म्हणजे शस्रक्रियेनंतर अवघ्या 48 तासांत महिलेला डिस्चार्ज देण्यात आला असून सदर महिलेची प्रकृती स्थिर आहे.