ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुजरात एटीएसनं जीएसटी फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणात मोठी कारवाई केलीय. माधव कॉपर लिमिटेड या खासगी कंपनीचे अध्यक्ष नीलेश पटेल यांना 762 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. तपास यंत्रणा नीलेश पटेलचा बराच काळ शोध घेत होती. परंतु, तो फरार होता. जीएसटी विभागानं अफझल सिजाणी, महंमद अब्बास, रफिक अली यांना करचुकवेगिरी प्रकरणात आधीच अटक केली होती. मात्र, नीलेश फरार होता. नीलेशवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नीलेशनं आपल्या अटकेला स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्जही केला होता; पण त्याला अटकपूर्व जामीन मिळू शकला नाही.