Tarun Bharat

शाहू समाधी स्थळ लोकार्पण सोहळा लोकोत्सव करुया

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधी स्थळाचा लोकार्पण सोहळा राजघराण्याला साजेसा असा करुया. हा सोहळा लोकोत्सव करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर यांनी केले.

  शाहू समाधी स्थळ लोकापर्ण सोहळय़ासंदर्भात महापालिकेत महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहू समाधी स्थळ समिती, संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीमध्ये सोहळय़ाबाबत सूचना करताना त्या बोलत होत्या.

 महापौर ऍड. लाटकर म्हणाल्या, शाहू समाधी स्थळ लोकार्पण सोहळा भव्यदिव्य स्वरुपात होणे आवश्यक आहे. हा संपूर्ण जिल्हय़ाचा उत्सव होण्यासाठी गुरुवार 9 रोजी नियोजन बैठक आयोजित केली आहे. बैठकीमध्ये तालीम संस्था, वसतीगृह, कुस्तीगीर, मर्दानी खेळाडू, शाहिर, शाहू घराण्यांशी संबंधीत सरदार घराणे, माजी महापौर यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

त्या पुढे म्हणाल्या, उत्सवादिवशी पोलिस अथवा आर्मीब्रँण्ड असावा. जिल्हयामध्ये या उत्सवाची  निर्मिती मोठया प्रमाणात व्हावी. हा उत्सव सोहळा तीन दिवस साजरा करण्यात यावा. यामध्ये एक दिवस अग्निदिव्य हा नाटकाचा प्रयोग एक दिवस शाहीरी, पारंपारीक कला त्यानंतर लोकार्पण सोहळा साजरा करुया. तालीम संस्था, बोर्डिंग्ज, कुस्तीगीर, मर्दानी खेळाडू, शाहिर यांनी पारंपारीक कला सादर करत सोहळयाच्या ठिकाणी उपस्थित राहावे. महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी महापालिकेतून एकत्र सोहळयाच्या ठिकाणी जाऊया अशी सूचनाही त्यांनी केली.

बैठकीला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, सभागृहनेता दिलीप पोवार, नगरसेविका सरीता मोरे, नगरसेवक ईश्वर परमार, जय पटकारे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहायक संचालक नगररचना प्रसाद गायकवाड, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, पुरभि लेखाधीकारी गणेश खोडके, माजी नगरसेवक राजेश लाटकर, नंदकुमार मोरे, आदिल फरास, समिती सदस्य वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्थापत्य अभियंता अभिजीत जाधव, संजय माळी, ठेकेदार व्ही. के. पाटील आदी उपस्थित होते. 

समाधी स्थळाला दिली भेट

 महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर यांनी मंगळवारी नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळाला भेट देवून पाहणी केली. तसेच लोकार्पण सोहळय़ासंदर्भात अधिकाऱयांना सूचना केली. यावेळी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. 

Related Stories

कोल्हापूर : सुळे आरोग्य पथकातील वादग्रस्त कर्मचाऱ्यांची बदली करा

Abhijeet Shinde

सीपीआर,गडहिंग्लज रुग्णालयात अत्याधुनिक बालरोग कक्ष

Sumit Tambekar

जिल्ह्यातील ४८० ग्रामपंचायतींसाठी निघणार फेरआरक्षण

Abhijeet Shinde

अनुप्रिया गावडेला भारत भूषण पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण : कोल्हापुरात चक्का जाम live

Abhijeet Shinde

बांबवडेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या निषेधार्थ शाहूवाडीत कडकडीत बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!