ऑनलाईन झाले प्रेम, आता विवाहाची करतेय प्रतीक्षा
प्रसिद्ध गायक जगजीत सिंह यांचे एक प्रसिद्ध गाणे आहे, ज्यातील एक ओळ प्रेमाची व्याख्या समजाविते, ‘ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन’. ही ओळ प्रेमात वय, अंतर किंवा धर्म-समुदाय यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या नसल्याचे दर्शविते. असेच काहीसे म्यानमारमधील एका 20 वर्षीय युवतीसोबत घडत आहे. तिचे मन 77 वर्षीय इसमावर जडले असून तो हजारो मैल अंतरावर राहतो.
म्यानमारमध्ये राहणारी 20 वर्षीय जो विद्यार्थिनी असून तिचा प्रियकर 77 वर्षीय डेव्हिड इंग्लंडमध्ये म्युझिक प्रॉडय़ुसर आहे. दोघेही 18 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. म्यानमारमधील स्थिती आणि कोरोना महामारीमुळे दोघेही परस्परांपासून दूर राहतात.
डेटिंग साइटवर भेट
जो आणि डेव्हिड यांची भेट एका डेटिंग साइटवर 18 महिन्यांपूर्वी झाली, जो एखाद्या मार्गदर्शकाच्या शोधात होती, जो तिला साथ देण्यासह शिक्षणात आर्थिक स्वरुपात मदत करेल. तर डेव्हिड फ्लर्टिंगच्या उद्देशाने साइटवर असायचे. मी नेहमीच स्वतःला मनाने तरुणच समजत होतो असे डेव्हिड सांगतात.
लवकरच करणार विवाह
दोघांनीही आता विवाह करण्याचा निश्चय केला आहे. जो चा पासपोर्ट तयार होताच आणि व्हिसा मिळताच ती डेव्हिड यांना भेटण्यासाठी ब्रिटनमध्ये पोहोचणार आहे. तेथेच दोघेही विवाह करणार आहेत. दोघांनीही परस्परांना अत्यंत काळजी घेणारे आणि मदतीस तत्पर ठरविले आहे.