Tarun Bharat

77,146 कोटींची दूरसंचार स्पेक्ट्रमसाठी बोली

जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचा बोलीमध्ये समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी सोमवारी जवळपास 77,146 कोटी रुपयांची बोली प्राप्त झाली आहे. सदरची बोली ही रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांच्याकडून आली आहे. स्पेक्ट्रमचा लिलाव हा 5 वर्षांच्या कालावधीनंतर होत असल्याची माहिती आहे. सोमवारी सुरु करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये 2,250 एमएचझेडपेक्षा अधिकच्या दूरसंचार स्पेक्ट्रमचे सादरीकरण करण्यात आले. तसेच यांची आरक्षीत सुरूवातीची एकूण किमत जवळपास 4 लाख कोटी रुपये ठेवली आहे. यापेक्षा कमी बोली लावली जात नाही.

दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी 77,146 कोटी रुपये मूल्याच्या स्पेक्ट्रमसाठी बोली प्राप्त झाली आहे. परंतु 700 ते 2500 एमएचझेड बँडमध्ये कोणतीही बोली आलेली नाही. सदरची लिलाव प्रक्रिया मंगळवारीही सुरु राहिली आहे.

प्राप्त लिलाव

सोमवारी 800 एमएचझेड, 900 एमएचझेड, 1800 एमएचझेड, 2100 एमएचझेड बँडच्या स्पेक्ट्रमसाठी बोली मिळालेली आहे. यामध्ये जवळपास एक तृतीयांश स्पेक्ट्रमचा लिलाव 700 एमएचझेड बँडमध्ये आहे.

 लिलावात 5 जी स्पेक्ट्रमचा समावेश नाही

स्पेक्ट्रमच्या सध्याच्या लिलावात 3300 ते 3600 मेगाहर्ट्जच्या फ्रीक्वेंसीचा समावेश नाही. याचा स्पेक्ट्रम 5जी सर्व्हीसेससाठी वापर होण्याचे संकेत आहेत.

Related Stories

5-जी स्पेक्ट्रम लिलावाच्या चौथ्या दिवसापर्यंत 1.49 लाख कोटीची बोली

Patil_p

कोरोनाच्या संकटात यामाहाचा ग्राहकांना दिलासा

Patil_p

रिलायन्स इंडस्ट्रिजच्या नफ्यात वाढ

Patil_p

पतधोरण बैठक ; सेन्सेक्सची झेप 1,000 अंकांवर

Amit Kulkarni

‘डॉ. रेड्डीज’चा नफा 553 कोटीवर

Patil_p

‘पॅनिक बुकिंग’ टाळावे : आयओसी

tarunbharat