निलजीत विनाकारण फिरणा-यांवर आता राहणार व्हिडीओ वॅाच
प्रतिनिधी / गडहिंग्लज
महामारी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लाॅकडाऊन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना घरी थांबून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. संचारबंदी असताना विनाकारण फिरणा-याची संख्या वाढत असल्याने कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन करून सुद्धा निलजी गावात विनाकारण फिरत गर्दी करत संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत.
याच पार्श्वभुमीवर विनाकारण फिरणा-याचावर व्हिडीओ वाॅच ठेवणार असल्याचा निर्णय दक्षता समितीने घेतला असून विनाकारण फिरत असताना व्हिडीओमध्ये तीन वेळा दिसणाऱ्यावर कडक कारवाई होणार आहे. केवळ महत्त्वाचे कामासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.