Tarun Bharat

ग्राम पंचायतींसाठी 79 टक्के मतदान

Advertisements

बहुतांश ठिकाणी उत्स्फूर्त मतदान : सर्वाधिक सत्तरीत 89.30 तर सर्वांत कमी 68.33 टक्के सालसेतमध्ये: उद्या सकाळपासून मतमोजणी

प्रतिनिधी /पणजी

राज्यातील 186 ग्राम पंचायतींसाठी काल बुधवार दि. 10 ऑगस्ट रोजी निवडणूक होऊन शांततापूर्ण सरांसरी 78.70 टक्के मतदान झाले. एकूण 1464 प्रभागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत सुमारे 5032 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून त्यांचा निकाल उद्या शुक्रवार दि. 12 ऑगस्ट रोजी होणाऱया मतमोजणीतून लागणार आहे.  सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान घेण्यात आले. पंचायत निवडणुकीत मतदारांनी उत्स्फ्tढर्त प्रतिसाद दिल्याचे एकंदरीत टक्केवारीवरून दिसून आले आहे. उत्तर गोव्यात 81.45 तर दक्षिण गोव्यात 76,13 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान सत्तरीत 89.30 टक्के झाले तर सर्वांत कमी मतदान सालसेतमध्ये 68. 33 टक्के झाले.

मतदानाला सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासात म्हणजे 10 वाजेपर्यंत सरांसरी 20 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढत गेली दुपारी 12 वाजेपर्यंत 40 टक्के मतदानाची नोंद झाली होती. काही ठिकाणी ही टक्केवारी 50 टक्क्यांपर्यंत गेली होती. उर्वरीत ठिकाणी दुपारी 2 वाजेपर्यंत 50 ते 55 टक्क्यांवर मतदान पोहोचले होते. सायंकाळी 4 वाजेपर्यंत बहुतेक ठिकाणी 70 टक्के मतदान झाल्याचे दिसून आले आणि शेवटी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 80 टक्के पेक्षा पुढे जावून 85 ते 90 टक्के एवढे होऊ शकते असे दिसून आले.

या निवडणुकीत एकूण 6,26,496 मतदारांनी मतदान केले. त्यात 2,99,708 पुरुषांनी तर 3,26,788 महिलांनी मतदान केले.

सर्वत्र अटीतटीच्या लढती रंगल्या

मतपत्रिकेच्या माध्यमातून ही पंचायत निवडणूक घेण्यात आली आणि ती पक्षीय पातळीवर नसली तरी अनेक राजकीय पक्षांनी, मंत्री, आमदार यांनी आपापले गट, सगे सोयरे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना रिंगणात उतरवले होते. तसेच त्यांना निवडणून आणण्यासाठी प्रयत्न चालवले होते. एकूण 1049 ठिकाणी असलेल्या एकूण 1566 मतदान केंद्रातून सदर निवडणूक घेण्यात आली.

रांगा नाही, पावसाचा परिणाम नाही

मतदान केंद्रांची संख्या अधिक असल्याने आणि मतदारांची संख्या कमी असल्याने कुठेही मोठय़ा रांगा दिसून आल्या नाहीत. पावसाचा कोणताही परिणाम या निवडणुकीवर झाला नाही आणि परिणाम होईल असा खूप पाऊसही पडला नाही. अधुनमधून पाऊस येत होता आणि लगेच जात होता.

सर्व मतदान केंद्रावर चोख व्यवस्था

सर्व मतदार केंद्रावर चोख पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर अन्य व्यवस्थाही चांगली होती. सुमारे 10,000 सरकारी अधिकारी कर्मचारी या पंचायत निवडणूक कामात गुंतले होते. सर्वत्र सुरळीतपणे मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगातफ्xढ पंचायत निवडणूक घेण्यात आली. आयोगाने एकूण प्रभागांपैकी 21 प्रभाग (12.32 टक्के)  अनुसूचित जमाती (एसटी), 307 प्रभाग (20.10 टक्के) इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटासाठी राखीव ठेवले होते.

अगोदरच 64 जणांची बिनविरोध निवड

या निवडणुकीत विविध वॉर्डांतील सुमारे 64 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्यामुळे तेथे मतदान घेण्यात आले नाही. त्यात उत्तर गोव्यातील 41 तर दक्षिण गोव्यातील 23 उमेदवारांचा समावेश आहे.

चिन्हांच्या घोळामुळे कळंगूटमध्ये निवडणूक रद्द

कळंगुट पंचायत प्रभाग 9 मध्ये दोन उमेदवार आणि त्यांचे निवडणूक चिन्ह जुळत नसल्याने गोंधळ उडाला. मतपत्रिका चुकीची असल्याचे समोर आले तेंव्हा उमेदवारांनी तक्रारी केल्यानंतर तेथील मतदान रद्द करण्यात आले. ते रद्द  केल्याची आणि फ्sढरमतदान आज गुरूवारी 11 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची अधिसूचना आयोगाने जारी केली आहे. मतदान रद्द करे पर्यंत 15 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुरूवारी सुटी नसल्यामुळे तेथे मतदान कमी होण्याची भिती उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

तालुकानिहाय मतदान सरासरी

 • फोंडा 80.20 टक्के
 • बार्देश 77.51 टक्के
 • तिसवाडी 75.85 टक्के
 • सत्तरी 89.30 टक्के
 • मुरगाव 72.35 टक्के
 • सांगे 84.86
 • डिचोली 89.27
 • धारबांदोडा 85.88
 • केपे 82.79
 • सालसेत 68.33
 • काणकोण 82.84
 • पेडणे 87.69 टक्के

Related Stories

पंचायतींनी वर्षभरात चार ग्रामसभा घ्याव्यात

Amit Kulkarni

राजेंद्र आर्लेकर बनले हिमाचलचे राज्यपाल

Amit Kulkarni

मुंबई सिटी एफसी आयएसएलच्या सातव्या मोसमाचे विजेते

Patil_p

हुंडय़ासाठी छळप्रकरणी पती, सासूला शिक्षा

Amit Kulkarni

राजकारणाच्या डावात मायकल लोबो अखेर सफल

Amit Kulkarni

उस्मानाबाद येथे 31 रोजी मराठी कवयित्री संमेलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!