वृत्तसंस्था /बेंगळूर
ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया टाटा पॉवरने 30 जून 2022 ला संपलेल्या तिमाहीमध्ये 795 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.
वर्षाच्या आधारावर पाहता मागच्या समान कालावधीच्या तुलनेमध्ये निव्वळ नफा हा तब्बल 103 टक्के अधिक आहे अशी माहिती टाटा पॉवरने दिली आहे. मागच्या वषी समान तिमाहीमध्ये टाटा पॉवरने 391 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. या तुलनेत कंपनीच्या महसुलातही दमदार कामगिरी दिसली आहे. जून 2022 ला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने 43 टक्के वाढीसह 14 हजार 495 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल प्राप्त केला आहे. जो मागच्या वषी कंपनीने 10 हजार 132 कोटी रुपये इतका कमावला होता, असेही माहितीतून समोर आले आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगच्या क्षेत्रात विविध कंपन्यांसोबत कंपनीने अलीकडे भागीदारी केली आहे. आगामी काळात नफ्यात वाढीची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे.