Tarun Bharat

8 आठवडय़ांमध्ये नेमणार तक्रार निवारण अधिकारी

दिल्ली उच्च न्यायालयात ट्विटरचे प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

येत्या आठ आठवडय़ांमध्ये म्हणजे जवळपास दोन महिन्यात ट्विटरने आपण तक्रार निवारण अधिकाऱयाची नियुक्ती करत असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले आहे. दोन दिवसांपुर्वीच झालेल्या सुनावणीवेळी तक्रार निवारण अधिकाऱयाची नियुक्ती किती दिवसात करणार याची ठोस माहिती देण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी ट्विटरने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

नवीन आयटी नियमांनुसार, तक्रार निवारण अधिकाऱयाच्या संपर्काचा पत्ता हा भारतातील असेल आणि त्याचे मुख्य कार्यालयही भारतातच असेल असेही ट्विटरने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. 25 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यामध्ये या कंपन्यांना भारतात एक तक्रार निवारण अधिकाऱयाची, एका विभागीय अधिकाऱयाची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याआधी 12 जून रोजी ट्विटरने नियुक्त केलेल्या तक्रार निवारण अधिकारी धर्मेंद्र चतुर यांनी आपला राजीनामा दिला होता. ट्विटरने काही दिवसांपूर्वीच त्यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर दुसऱया कोणत्या व्यक्तीची नियुक्ती का केली नाही असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने ट्विटरला केला होता. त्यावर नियुक्तीची प्रक्रिया लवकरच पार पाडणार असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात यापूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करताना ट्विटरने आपण केंद्र सरकारच्या नव्या आयटी कायद्याचे पालन केले नसल्याची कबुली दिली होती. त्यावर आपण ट्विटरला कोणतेही संरक्षण देऊ शकत नाही, केंद्र सरकार ट्विटरवर कारवाई करण्यास स्वातंत्र्य असल्यास दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Related Stories

अवमाननाप्रकरणी मल्ल्याला चार महिन्यांचा तुरुंगवास

Patil_p

ईपीएफ चा व्याजदर 8.50 टक्क्यांवर जैसे थे

Tousif Mujawar

माताभगिनींचे सुरक्षा कवच प्राप्त

Patil_p

बंगालला स्वतःची मुलगी हवी, आत्या नको

Amit Kulkarni

मोदी सरकारची 8 वर्षे, भाजपकडून मोठी तयारी

Patil_p

नववर्षात रेल्वेप्रवास महागला

Patil_p
error: Content is protected !!