मुंबई
सेन्सेक्समधील 10 कंपन्यापैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1,15,837 कोटी रुपयांनी वाढले आहे. मागील आठवडय़ात झालेल्या या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे बाजार भांडवलमूल्य मात्र घसरणीत राहिले होते. शेअरबाजाराने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 71462.28 कोटी रुपयांनी वाढून 1841994.48 रुपयांवर पोहोचले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे भांडवल 614488.60 कोटी रुपयांनी वाढले होते.