नवी दिल्ली
मागच्या आठवडय़ात सेन्सेक्समधील 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल 1 लाख 18 हजार 930 कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसले. मागच्या आठवडय़ात शेअर बाजारात एकंदर 760 अंकांची तेजी दिसून आली. यात दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज आणि आयसीआयसीआय बँकेच्या बाजार भांडवलात मात्र घसरण दिसली. टीसीएसचे बाजार भांडवल 40,782.04 कोटींनी वाढून 12 लाख 98 हजार 15.62 कोटी रुपयांवर पोहचले. एसबीआयच्या बाजार भांडवलात 25 हजार 33.54 कोटींची वाढ झाली आहे.