नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) वतीने घेण्यात येणारी सनदी सेवा मुख्य परीक्षा येत्या 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहे. मुंबईसह अहमदाबाद, ऐझवाल, प्रयागराज, बेंगळूर, भोपाळ, चंदिगढ, चेन्नई, कटक, देहराडून, दिल्ली, दिसपूर, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा या देशातील 24 शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षेतून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरून 11 नोव्हेंबरपर्यंत यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे. या मुख्य परीक्षेसाठी 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूर्व परीक्षेतून 10 हजार 564 उमेदवार निवडण्यात आले आहेत.