कुणाशी बाजारात तर कुणाशी रुग्णालयात झाली प्रथम भेट
एक वैवाहिक नाते सांभाळताना लोकांची दमछाक होत असते. परंतु एका व्यक्तीने 1-2 नव्हे तर 8 विवाह केले आहेत. थायलंडच्या या व्यक्तीच्या 8 पत्नी आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या सर्व एकाच छताखाली राहत आहेत.
थायलंडचा रहिवासी ऑन्ग डॅम सोरोट सोशल मीडियावर अत्यंत चर्चेत असतो. कारण तो एक टॅटू आर्टिस्ट आहे तसेच त्याच्या 8 पत्नी असून त्या सर्व एकाच घरात एकत्रित राहतात. त्याच्या सर्व पत्नींमध्ये मधूर नाते आहे, तसेच त्या ऑन्गला जगातील सर्वात सज्जन व्यक्ती मानतात.
ऑन्गल प्रत्येक पत्नीला अत्यंत अनोख्या प्रकारे पहिल्यांदा भेटला होता. प्रत्येकवेळी त्याला पहिल्या भेटीतच प्रेम झाले आणि भेटण्याच्या जागाही अत्यंत विचित्र आहेत. पहिली पत्नी नॉन्ग स्प्राइटशी ऑन्ग स्वतःच्या एका मित्राच्या विवाहात भेटला होता. पहिल्या नजरेतच त्याचे नॉन्गवर प्रेम जडले आणि दोघांनी विवाह केला.
नॉग्न एल ही त्याची दुसरी पत्नी असून तिला तो बाजारात भेटला होता. तिसरी पत्नी नॉन्गन नॅनला ऑन्ग रुग्णालयात भेटला होता. तर स्वतःच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या पत्नीला ऑन्गची भेट क्रमानुसार इन्स्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर झाली होती. एकदा ऑन्ग स्वतःच्या आईसोबत प्रसिद्ध मंदिरात गेला होता, तेथे त्याची भेट सातवी पत्नी नॉन्ग फिल्मसोबत झाली आणि आठवी पत्नी नॉन्ग माईला तो सुटीदरम्यान भेटला होता, जेथे त्याच्या अन्य पत्नी देखील सोबत होत्या.
पत्नी करतात व्यवसाय
ऑन्ग आम्हा सर्वांना समान प्रेम करतो आणि अत्यंत काळजी घेतो, आमच्यामध्ये परस्परांमध्ये भांडणाचा कुठलाच मुद्दा नसतो असे त्याच्या आठही पत्नी सांगतात. ऑन्ग पैसेवाला असल्यानेच त्याने इतके विवाह केल्याचे सोशल मीडियावर लोकांना वाटत असले तरीही ते सत्य नाही. त्याच्या सर्व पत्नी लहान मोठा व्यवसाय करून पैसे कमावितात. माझ्यापासून कधीच काहीही लपवू नका, जर अन्य पुरुषावर प्रेम जडले तर तेही उघडपणे सांगा, घटस्फोट हवा असेल तर तसेही स्पष्टपणे सांगा असे ऑन्गने स्वतःच्या पत्नींना सांगितले आहे.