नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीताराम येचुरी यांची सलग तिसऱ्यांदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय-एम) सरचिटणीस किंवा महासचिवपदी रविवारी फेरनिवड झाली आहे. 69 वषीय येचुरी 2015 पासून सरचिटणीस पदावर कायम आहेत. त्यांच्यापूर्वी प्रकाश करात हे पक्षाचे सरचिटणीस होते. प्रकाश करात यांनी 2005 ते 2015 या काळात सरचिटणीसपद भूषवले होते. येचुरी यांची 2015 मध्ये पहिल्यांदा पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवड झाली होती. यानंतर ते 2018 मध्ये दुसऱयांदा ते सीपीआय(एम)चे सरचिटणीस बनले. सरचिटणीस किंवा महासचिव हे पक्षातील सर्वोच्च पद आहे. केरळमधील कन्नूर येथे आयोजित पक्षाच्या 23 व्या परिषदेच्या शेवटच्या दिवशी सीताराम येचुरी यांची सलग तिसऱयांदा सीपीआय-एमचे सरचिटणीस म्हणून निवड झाली. या निवडीनंतर येचुरी यांनी सलग तिसऱयांदा पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत.