Tarun Bharat

इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलनादरम्यान 8 जणांचा मृत्यू

Advertisements

एक हजाराहून अधिक जणांना अटक

वृत्तसंस्था /तेहरान

इराणमध्ये 16 सप्टेंबरपासून सुरू झालेले हिजाबविरोधी आंदोलन अद्याप सुरू आहे. गुरुवारपर्यंत हे आंदोलन 15 शहरांमध्ये फैलावले आहे. या आंदालेनादरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष देखील होत आहे. लोकांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला आहे. पोलिसांच्या गोळीबारात गुरुवारी 3 जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे आतापर्यंत 8 आंदोलकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 1 हजाराहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तर सरकारच्या मॉरल पोलिसिंगच्या विरोधात तरुण-तरुणींनी गरशाद नावाचे ऍप तयार केले आहे. हे ऍप मागील 5 दिवसांमध्ये 10 लाख लोकांनी डाउनलोड केले आहे. तरुण-तरुणी या ऍपद्वारे सिक्रेट मेसेजची देवाणघेवाण करत आहेत. यामुळे तेहरानमध्ये मोबाइल इंटरनेट बंद करण्यासह इन्स्टाग्राम ब्लॉक करण्यात आले आहे.

Related Stories

युरो चलन वापरणाऱ्या देशांमध्ये महागाई 9.1% वर

Abhijeet Khandekar

भेटण्याची अन् चर्चा करण्याची ही वेळ

Omkar B

डोळय़ांपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू संसर्ग

Patil_p

कोरोनाच्या संक्रमणाची 28 लक्षणे

Omkar B

चिनी मोबाईल कंपन्या भारताच्या रडारवर

Patil_p

जपान : 13 कोटींमध्ये माशाची विक्री

Patil_p
error: Content is protected !!