उपराज्यपाल मनोज सिन्हांकडून शोक व्यक्त
वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू विभागातील किश्तवाड जिल्हय़ात एका भीषण रस्ते दुर्घटनेत 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाने नियंत्रण गमावल्याने वाहन खोल दरीत कोसळले होते. या दुर्घटनेत 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर 3 जणांनी उपचारासाठी हलविले जात असताना अखेरचा श्वास घेतला आहे. जखमींना स्थानिक, पोलीस आणि सैन्याच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.