Tarun Bharat

रुग्णालयातील आगीत मध्यप्रदेशमध्ये 8 ठार

भोपाळ / वृत्तसंस्था

मध्यप्रदेशमधील जबलपूरच्या शिवनगर येथील न्यू लाईफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी आग लागली. या आगीत रुग्णालयातील कर्मचाऱयांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर आग लागल्यामुळे लोकांना बाहेर पडता न आल्याने जीवितहानीचा आकडा वाढल्याची माहिती देण्यात आली.

जबलपूरमधील चांडाल भाटा भागातील न्यू लाईफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी आग लागली. काही वेळातच त्याने भयानक रूप धारण केले. यामध्ये अनेक रुग्ण दगावले. मृतांमध्ये चार रुग्ण, एक परिचरिका आणि तीन इस्पितळातील कर्मचाऱयांचा समावेश आहे. दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. इतरांना शहरातीलच वेगवेगळय़ा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी इलैया राजा यांनी आठ जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मध्यप्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत राज्य सरकार करणार आहे. जखमींच्या संपूर्ण उपचाराचा खर्चही सरकार उचलणार आहे.

जनरेटरने पेट घेतल्याने आगीचा भडका?

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. लागलीच वरि÷ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱयांनीही पुढाकार घेतला. आगीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. योग्य कारणांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात वीज प्रवाहामध्ये चढ-उतार झाल्याचे बोलले जात आहे. वीजप्रवाह वाढल्यानंतर जनरेटरने पेट घेतल्याने काही क्षणातच इस्पितळाच्या संपूर्ण इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाने तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्मयात आणली. आग इतकी भीषण होती की लोकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. काहीजण आगीतच पूर्णपणे जळून खाक झाले. अपघाताच्या वेळी रुग्णालयात किती रुग्ण दाखल होते, किती नातेवाईक होते याची माहिती संकलित करण्यात येत आहे.

Related Stories

निर्भय क्रूज क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

Patil_p

फारुख अब्दुल्लांची स्थानबद्धतेतून सुटका

tarunbharat

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

datta jadhav

रेशन दुकानात मिळणार आता फोर्टिफाईड तांदूळ

Patil_p

उत्तराखंडचे मुख्यमंत्री अडचणीत

Patil_p

खरीप पिकांचे यंदा विक्रमी उत्पादन

Patil_p