राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
मिरज : गोवा राज्यातून विदेशी दारू आणून महाराष्ट्र राज्याचे लेबल लावून वाहतूक आणि विक्री करत असल्याची मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार नागज फाटा येथे सापळा रचून गोवा बनावटीची विदेशी दारू तस्करी करणाऱ्या बोलेरो गाडीसह दोघाना ताब्यात घेतले आहे.
वाहनामध्ये १२ पोत्यांमध्ये गोवा बनावटीचीविदेशी दारू चा साठा आढळून आला. यावेळी मिलिंद लक्ष्मण मलमे (पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर) तसेच वाहन मालक भगवान सुखदेव करचे या दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवा बनावटीची विदेशी दारू ३३६ बाटल्या. त्यासोबत लेबल आणि बाटलीचे बुच असा एकूण ८ लाख २० हजाराचा मुद्देमाल मिरज उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. गोवा बनावटीची विदेशी दारू येथे आणून बाटली मध्ये भरून महाराष्ट्र राज्याचे लेबल लावून विक्री करणारी टोळी आज गजाआड झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क सांगली अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उत्पादन शुल्क निरीक्षक अरुण शंकर कोळी, दुय्यम निरीक्षक जितेंद्र पवार अभिनंदन कांबळे आणि पथकाने कारवाई केली आहे.
हे ही वाचा : गोवा बनावटीचे 36 लाखांचे मद्य जप्त; भोगावतीजवळ सापळा रचून कारवाई