वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या विजेच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. सरकारकडून दर महिन्याला विजेच्या वापराबाबत जी आकडेवारी जाहीर केली जाते या अंतर्गत नोव्हेंबर महिन्यामध्ये विजेच्या वापरामध्ये जवळपास 8 टक्के वाढ दर्शवली गेली आहे.
उत्सवी काळामध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचेही कारण विजेच्या वापरामध्ये दिसून आले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 110.25 अब्ज युनिट इतक्या विजेचा वापर करण्यात आला होता. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये हा वापर 99.32 अब्ज युनिट इतका होता. नोव्हेंबरमध्ये एकाच दिवशी 204.60 गिगा वॅट इतक्या सर्वाधिक विजेचा वापर करण्यात आला होता. यंदा चांगल्या पावसामुळे मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये विजेचा वापर तुलनेने कमी करण्यात आला. मात्र त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये मात्र विजेची मागणी वाढताना दिसली. उत्सवीकाळासोबतच औद्योगिक हालचालींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याने विजेचा वापर वाढला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 8 टक्के इतकी विजेची मागणी वाढली होती.