Tarun Bharat

कोकण-कोल्हापूरमध्ये ८ पट्टेरी वाघ

वन विभागाच्या कॅमेरा ट्रपिंगमधील हालचालींची नोंद : एक जोडी दक्षिण कोकणात स्थिरस्थावर

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्हय़ात कोकणातून संचार करणाऱया वाघांच्या अस्तित्वावर वन विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. कोकण आणि कोल्हापूर जिल्हय़ात 8 पट्टेरी वाघांचा वावर निश्चित झाला आहे. त्यातील एक जोडी दक्षिण कोकणात अधिवास करून राहिली आहे. वन विभागाच्या कॅमेरा ट्रपिंग नोंदीतून हे समोर आले आहे. यासंदर्भातील निरीक्षणे प्राणीतज्ञांनीही नोंदवली आहेत.

स्वातंत्र्यपुर्व काळापासून कोकणामार्गे कोल्हापुरात वाघांचा संचार होता, आजही तो आहे, यावर वन विभागाच्या कॅमेरा ट्रपिंगद्वारे शिक्कामोर्तब झाले आहे. व्याघ्र अभ्यासकांना कोकण अन् कोल्हापूर जिल्हय़ातील भ्रमण मार्गात 8 वाघांचे दर्शन घडले आहे. त्यापैकी एक जोडी दक्षिण कोकणातील अधिवासात कायमस्वरूपी ठाण मांडून असल्याचे निरीक्षणही अभ्यासकांनी नोंदवले आहे.

हे ही वाचा : जोतिबावर भाविकांची अलोट गर्दी

कर्नाटक, गोव्यातून काही काळासाठी पट्टेरी वाघ, कोकण अन् कोल्हापूर भागात येतात. गुरांची होणारी शिकार पाहता वाघांचा कोल्हापूर जिल्हय़ातील वनक्षेत्रात वावर वाढल्याचेही समोर आले आहे. वाघांसह अन्य वन्यजीवांची हालचाल टिपण्यासाठी वनक्षेत्रात कॅमेरे लावले आहेत. दोन वर्षांपुर्वी कोकण अन् कोल्हापूरच्या वनक्षेत्रात 8 वाघ वावरताना कॅमऱयात कैद झाले आहेत. 2014 पासून वाईल्डलाईफ कंझर्व्हेशन ट्रस्ट कॅमेरा ट्रपिंगद्वारे वाघांच्या अस्तित्वाचा शोध या भागात घेत आहे. याच ट्रस्टने आता 8 वर्षांपासून वाघाची एक जोडी दक्षिण कोकणात राहत असल्याची माहिती वाईल्डलाईफ कंझर्व्हेशन ट्रस्टचे वन्यजीव अभ्यासक गिरीश पंजाबी यांनी दिली.

वाघिणींची संख्या कमी.. वाघ कमी काळासाठी या भागात

गिरीश पंजाबी म्हणाले, या क्षेत्रात सहा वाघांचे दर्शन सतत दिसून येत आहे. तरीही त्यांना स्थानिक वाघ म्हणून संबोधणे घाईचे ठरणार आहे. प्रतिवर्षी कॅमेरा ट्रपिंगद्वारे कोकण अन् कोल्हापूर दरम्यानच्या पट्टय़ात किती वाघ स्थायिक झालेत, याची माहिती माहिती मिळणे शक्य झाले आहे. वन विभाग वाघांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या जनावरांसाठी आपद्ग्रस्तांना तातडीने भरपाई देत आहे, ही बाब व्याघ्र संवर्धनासाठी उपयुक्त ठरत आहे. कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील काही वाघ काही काळासाठी कोकण पट्टय़ात येत आहेत. पण वाघिंणींची संख्या कमी असल्याने ते फार काळ थांबत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

22 कॅमेऱ्यांद्वारे होते ट्रपिंग
कोल्हापूरचे वनाधिकारी विशाल माळी म्हणाले, कॅमेरा ट्रप सर्व्हेक्षणात गतवर्षी नोव्हेंबर ते यंदा एप्रिल या 6 महिन्यात दक्षिण कोकण अन् कोल्हापूर जिल्हय़ात 22 ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. काही ठिकाणी 2 तर काही ठिकाणी सहा महिन्यांपासून वाघांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. मार्चमध्ये राधानगरीत आढळलेला वाघ आता अभयारण्याबाहेर संचार करत आहे. कोल्हापुरात वाघांचा वावर आहे, ही निश्चितच आनंददायी बाब आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

पूरस्थितीत कर्तव्यच्युत अधिकाऱ्यांची गय नाही

Archana Banage

जलसमाधी घेणारा आंदोलकच गायब झाल्याने प्रशासनाची उडाली भंबेरी

Archana Banage

जिल्हा परिषद कर्मचाऱयांचा थंडा प्रतिसाद

Archana Banage

भूमीपुत्रांना फौंड्रीच्या प्रशिक्षणासह नोकरीची हमी

Archana Banage

‘गोकुळ’मध्ये सत्तांतर हा भ्रमच; आमदार सतेज पाटील यांचा टोला

Archana Banage

जिवाबनाना पार्क येथील उपोषणाला यश, प्रशासनाकडून मागण्या मान्य

Archana Banage
error: Content is protected !!