Tarun Bharat

फोंडा तालुक्यात 80.20 टक्के मतदान

Advertisements

सर्वाधिक भोम अडकोण पंचायतीमध्ये तर सर्वात कमी पंचवाडीत

प्रतिनिधी /फोंडा

फोंडा तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सरासरी 80.20 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 88.36 टक्के मतदान भोम-अडकोण पंचायतीमध्ये  तर सर्वांत कमी 71.64 टक्के मतदान पंचवाडी पंचायतीमध्ये झाले. मतदानाची एकंदरीत प्रक्रिया शांततेत पार पडली. पावसाच्याही एक दोन सरी सोडल्यास दिवसभर मतदारांची फारशी गैरसोय झाली नाही. बहुतेक पंचायतींमध्ये 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. फोंडा तालुक्यात 19 पंचायतींच्या 166 प्रभागांमधून 602 उमेदवार रिंगणात होते.

 दुपारपर्यंत बहुतेक पंचायतीमध्ये 50 टक्के मतदान झाले होते. अकरा प्रभाग असलेल्या काही मोठय़ा पंचायतींमध्ये मतदारांची संख्या जास्त असल्याने मतदान केंद्रा बाहेर रांगा दिसत होत्या. तरुण मतदारांबरोबरच मोठय़ा प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला.

रविवारी सकाळी 8 वा. पासूनच बहुतेक पंचायतीमध्ये उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्यावेळी बऱयाच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणच्या केंद्रावर दुपारच्यावेळी मतदारांची गर्दी दिसत होती. ऐन मोन्सुनच्या तोंडावर हे मतदान झाल्याने मतदारांना पावसाचा त्रास होऊ नये यासाठी बहुतेक  केंद्राबाहेर ताडपत्री घालून मांडव उभारण्यात आले होते. मात्र पावसाच्या एक दोन सरी सोडल्यास दिवसभर मतदारांना फारसा त्रास झाला नाही. फोंडा तालुक्यातील सर्व 19 पंचायतींची मतमोजणी शुक्रवार 12 रोजी सकाळी 8 वा. पासून फर्मागुडी येथील आयटीआय कॉलेजमध्ये होणार आहे.

ग्रामपंचायतवार मतदानाची टक्केवारी

मडकई मतदार संघातील मडकई पंचायतीमध्ये 85.32, कुंडई 85.78, बांदोडा 76.94, कवळे 75.67, वाडी-तळावली 86.61, दुर्भाट पंचायतीमध्ये 85.64 मतदान झाले. शिरोडा मतदार संघातील शिरोडा पंचायतीमध्ये 72.55, बेतोडा-निरंकाल 86.15, बोरी 82.27 तर पंचवाडी पंचायतीमध्ये 71.64 टक्के मतदान झाले. प्रियोळ मतदार संघातील वेलिंग-प्रियोळ पंचायतीमध्ये 82.60, बेतकी-खांडोळा 84.23, तिवरे – वरगांव 84.15, केरी 86.37, वेरे-वाघुर्मे 82.79,  वळवई 88.32 तर भोम अडकोण पंचायतीमध्ये 88.36 टक्के मतदान झाले. फोंडा मतदार संघातील कुर्टी-खांडेपार पंचायतीमध्ये 74.68 तर वाळपई मतदार संघातील उसगाव-गांजे पंचायतीमध्ये 80.94 टक्के मतदान झाले.

Related Stories

सार्वजनिक गणपतींनी घेतला दीड दिवसांतच निरोप

Omkar B

भाजप सत्तेच्या मागे धावणारा पक्ष नाही!

Omkar B

अग्निशामक दलात पाणबुडे नियुक्त करणार

Amit Kulkarni

सुकूर पंचायतीच्या सरपंचपदी अनिल पेडणेकर यांची निवड

Amit Kulkarni

किनारी भागात व्यवसायासाठी करणार अनुकूल वातावरण

Amit Kulkarni

नोकरीत कायम करा अन्यथा प्रखर आंदोलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!