Tarun Bharat

शंभू स्मारकासाठी 80 लाख लोकवर्गणी लागणार

शिवशंभूप्रेमी, दानशूरांनी सढळ हस्ते मदत करावी- रणजित पाटील यांचे आवाहन

प्रतिनिधी/ कराड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथील नियोजित छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामासाठी 10 टक्के लोकवर्गणीची अट असून ही लोकवर्गणी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीला जमवावी लागणार आहे. त्यामुळे तमाम शिवशंभू प्रेमी व दानशूरांनी सढळ हस्ते समितीला मदत करावी, असे आवाहन समितीचे सचिव रणजितनाना पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्टय़पूर्ण योजनेतून या स्मारकाला 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध झाला आहे. हा निधी मंजूर करताना  10 टक्के लोकवर्गणी जमवण्याची अट आहे. तथापि, कराड नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने 10 टक्के लोकवर्गणी स्मारक समितीला जमवावी लागणार आहे.

स्मारकाचा 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून निधी जमवण्याचे नियोजन समितीकडून यापूर्वीच करण्यात आले होते. यासाठी शंभू स्मारक संवाद यात्रा सुरू करून कराड तालुक्यातील गावोगावी बैठका घेऊन स्मारकाची महिती देण्यात आली आहे. त्यावेळी गावोगावच्या शिवशंभू प्रेमी व ग्रामस्थांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कराड शहरातही निधी जमवण्यासाठी सर्वपक्षीय व विविध संघटना तसेच सर्व समाजघटकांची मदत घेण्याचे नियोजन आहे. स्मारक भव्य असल्याने देखभालीसाठीही तरतूद करावी लागणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेता जादा निधी जमवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे लोकवर्गणी जमवण्यासाठी सर्व समाजघटकांनी सढळ हस्ते मदत करावी. कराड तालुक्यातील तमाम शिवशंभू प्रेमी व दानशूर लोक भरीव मदत करतील, असा विश्वास  रणजितनाना पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

क्रीडा पुरस्कारासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करा : जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे

Archana Banage

सिव्हील हॉस्पिटलमधील धोब्याच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

शिवराय अन् रामदास स्वामींच्या भेटीचे पुरावे जिल्हाधिकाऱयांना सादर

Patil_p

बेकायदा पिस्टल बाळगणाऱया तिघांना अटक

Patil_p

पाच कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

datta jadhav

कोल्हापूर : तिळवणीत एका युवकास कोरोनाची लागण

Archana Banage