मुख्य अभियंते स्टिफन फर्नांडिस यांचे उद्गार : दुर्भाट आगापूर पंचायत क्षेत्रात भूमिगत वीज वाहिन्या योजनाला प्रारंभ
वार्ताहर / मडकई
अवघ्या आठ महिन्यात ऊ. 800 कोटीची वीज सुधारणेची कामे मार्गी लावून वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्याच्या वीज खात्यात विक्रम नोंदविला आहे. वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना मुक्तपणे काम करण्याची संधी देणाऱ्या मंत्री ढवळीकरांचे कार्य खरोखरच अभिनंदनीय आहे. कामाचा वेग व गती कुठल्याच परिस्थीतीत मंदावणार नाही याची ते कटाक्षाने काळजी घेताता, असे प्रतिपादन वीज खात्याचे मुख्य अभियंते स्टिफन फर्नांडीस यांनी केले.
दुर्भाट आगापूर पंचायत क्षेत्रासाठी भूमिगत वीज वाहिन्या जोडणी योजनेच्या पायाभरणी सोहळ्यात ते बोलत होते. चिकली आगापूर येथे झालेल्या या कार्यक्रमाला कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दुर्भाट आगापूर पंचायतीच्या सरपंचा क्षिप्रा आडपईकर, कार्यकारी अभियंते पी. पी. भरथन, साहाय्यक अभियंते केशव गावडे, उपसरपंच शिवदास गावडे, पंचसदस्य चंदन नाईक, कृष्णा नाईक, दीपा नाईक, गौरेश नाईक, अमृता नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री ढवळीकरांनी वीज खात्याचा पदभार साभाळताच मडकई मतदार संघात सर्वांत आधी भूमीगत केबल नेण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागात हा प्रकल्प राबविणे खूप कठिण असते. मंत्री ढवळीकरांची 23 वर्षाची प्रदीर्घ अशी यशस्वी वाटचाल, जनतेचा त्यांच्यावरील विश्वास व मतदार संघाच्या संघटीतपणामुळे हा प्रकल्प राबविणे शक्य झाल्याचे फर्नांडीस यांनी नमूद केले.
मडकईत 1.70 व फोंडा तालुक्यात 400 कोटींचा भूमीगत केबल
मडकईत ऊ. 1.70 कोटी खर्चून तर फोंडा तालुक्यासाठी 400 कोटी खर्चून भूमीगत वीज वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. ग्रामीण भागातील अंरुद रस्ते व त्यातून चर खोदणे गैरसोयीचे असते. वाहतूक व धूळ प्रदूषचा त्रास लोकांना होऊ नये याची वीज खाते काळजी घेत आहे. विकासा बाबत मडकईतील जनतेचा मंत्री ढवळीकर यांच्यावर दृढ विश्वास आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे, असे स्टिफन फर्नांडिस म्हणाले.
मंत्री ढवळीकरांचे राजकीय प्रवासातील पैलू उल्लेखनीय
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा ईडीसी चेअरमन ते वीजमंत्रीपर्यंतच्या 23 वर्षाच्या राजकीय प्रवासाला अनेक कंगोरे आहेत. विकासकामातून त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे उलगडून दाखविलेले विविध पैलू उल्लेखनीय असल्याचे गणपत नाईक म्हणाले. मतदार संघाची गरज व नागरिकांच्या समस्येची जाण असलेला जाणता राजा म्हणून त्यांचा उल्लेख खूप मोठ्या अभिमानाने केला जातो. सततच्या खंडित विजेमुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. भुमीगत वीज वाहिन्यांमुळे हा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे मंत्री ढवळीकर यांचे अभिनंदन करणे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कामाचा ओघ व तळमळ गेली 23 वर्षे अनुभवत आहे. ते अभिनंदानास निश्चितच पात्र आहेत.
भूमीगत वाहिन्या या मडकईच्या विकासात मानाचा तुरा- केशव गावडे
मडकई मतदार संघात मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या विकासाला तोड नाही. भूमीगत वीज वाहिन्या हा या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुराण व इतिहासाची पाने चाळल्यास, ज्या माणसाची संगत चांगली असते, तेथेच चांगले घडत असते. मंत्री ढवळीकरांची संघाटना सबळ व आचार विचार उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना कुठलीच गोष्ट कठिण जात नाही. या तप:श्चर्येची स्तुती करावी लागेल.
स्वागत क्षिप्रा आडपईकर यांनी केले. गणपत नाईक व अन्य मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्जवलीत व फलकाचे अनावरण करुन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन दीपा मिरींगकर यांनी तर अजय परांजपे यांनी आभार मानले.