अनेकवेळा आपण डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरही व्यक्ती जिवंत झाल्याचा विस्मयकारी घटना ऐकली असेल. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद शहरातील 81 वर्षांच्या आज्जीसोबत घडली आहे. ब्रेन हॅब्रेज मुळे बिलासपूर मधील एका आज्जीचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. मात्र अंत्यसंस्कारावेळी या आज्जीने डोळे उघडले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. कुटुंबियांच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. त्यानंतर आज्जी चहाही प्यायली. मात्र कुटुंबियांचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. आश्चर्यकारकरित्या जिवंत झालेल्या या आज्जीचे दुसऱ्याच दिवशी निधन झाले.
Previous Articleकुख्यात गुंड सचिन जुमनाळकर अद्यापही फरार
Next Article सावधान ! रस्त्यावर वाहने लावताय…