Tarun Bharat

केपे तालुक्यातील 11 पंचायतींत 82.79 टक्के मतदान

Advertisements

सर्वांत जास्त मतदान मोरपिर्ला, तर सर्वांत कमी मतदान अवेडे कोठंबी पंचायतीत

वार्ताहर /केपे

केपे तालुक्यातील 11 पंचायतींत 82.79 टक्के मतदान झाले असून 11 पंचायतींतून 240 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. सर्वांत जास्त मतदान मोरपिर्ला पंचायतीत 91.10 टक्के, तर सर्वांत कमी मतदान अवेडे कोठंबी पंचायतीत 74.28 टक्के इतके झाले आहे. असोल्डा पंचायतीत 82.05, शेल्डे 78.10, आंबावली 83.23, बाळ्ळी 86.48, फातर्पा 79.33, बेतूल 79.80, बार्से 90.45, कावरेपिर्ला 84.78, तर मळकर्णे पंचायतीत 83.49 टक्के मतदान झाले आहे. केपे तालुक्यातील 82 मतदान केंद्रांतून 13632 पुरुष, तर 15196 महिलांनी मतदान केले आहे. एकूण 34822 मतदारांपैकी 28828 मतदारांनी मतदान केले.

11 पंचायत क्षेत्रे चार मतदारसंघांत समाविष्ट असून आजी-माजी आमदारांसोबत इतर नेत्यांनी आपापल्या मर्जीतले उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे दिसून आलेले आहे. यात कोण बाजी मारेल हे मतपेटय़ा उघडल्यावरच स्पष्ट होईल. सध्या सर्वांनी आपलेच समर्थक बाजी मारतील व पंचायतीत सत्ता काबिज करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मोरपिर्ला पंचायतीतून पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न करणारे माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रकाश अर्जुन वेळीप, खोल पंचायतीतील कृष्णा वेळीप, फातर्पा पंचायतीत आमदार एल्टन डिकॉस्ता यांचे बंधू सांजिल डिकॉस्ता, माजी सरपंच मेदिनी नाईक, केपे भाजप महिला मोर्चा अध्यक्षा शीतल नाईक, केपे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विराज देसाई, बाळ्ळीमधून केपे भाजप मडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, राज्य भाजप अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष प्रभाकर गावकर, बार्सेचे मावळलेले सरपंच अर्जुन वेळीप, आंबावलीत मावळलेल्या सरपंच जेन्सिता डायस, शेल्डे पंचायतीत माजी मंत्री डॉमनिक फर्नांडिस यांचे सुपुत्र जोहान फर्नांडिस, आपचे नेते जेम्स फर्नांडिस, मळकर्णे पंचायतीत भाजपचे राजेश गावकर यांच्यासहित अनेक उमेदवारांची राजकीय वाटचाल या पंचायत निवडणुकीवर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर टिकून आहेत.

कावरेपिर्ला पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी एकाच पंचायतसदस्याची गरज आहे. कारण यापूर्वीच या पंचायतीतून भाजप समर्थक तीन सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे सात सदस्य असलेल्या या पंचायतीत आणखी एक सदस्य निवडून येताच सत्ता भाजपकडे येईल.

Related Stories

‘हर घर तिरंगा’ महोत्सव यशस्वी करावा

Amit Kulkarni

बाणावलीत 9 लाख रूपये किंमतीची दारू जप्त

Amit Kulkarni

कोरोनाचे थैमान, 713 नवे बाधित

Patil_p

‘आप’च्या पाठिंब्याशी आमचा संबंध नाही

Amit Kulkarni

सरकारी नोकरीच करणार ही मानसिकता बदला

Amit Kulkarni

मुरगावच्या पहिल्या नगरसेवक मारिया डिसोझा यांचा सत्कार

Patil_p
error: Content is protected !!