नवी दिल्ली
देशाची कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. वर्षाच्या दुसऱया तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत एकूण 20.57 अब्ज डिजिटल व्यवहार झाले. यापैकी 83 टक्के युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) द्वारे केले गेले असल्याची माहिती मिळाली आहे.
एनपीसीआयकडून दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये यूपीआयद्वारे देशात एकूण 11.16 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. ही आकडेवारी ऑगस्टपेक्षा जास्त आहे. ऑगस्टमध्ये यूपीआयच्या माध्यमातून एकूण 10.72 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये एकूण 768 कोटी म्हणजेच 7.68 अब्ज वेळा यूपीआयद्वारे पैशाचे व्यवहार झाले आहेत.