ऑनलाईन टीम / जिनेव्हा :
जगभरातील 85 देशांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. अन्य व्हेरिएंटपेक्षा डेल्टा अधिक संसर्गजन्य असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आता 85 देशांमध्ये फैलावत आहे. त्याचा वेग कायम राहिला तर तिसरी लाट अटळ आहे. त्यामुळे संबंधित देशांनी सावधगिरी बाळगावी, कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे. जागतिक पातळीवर अल्फा व्हेरिएंट 170 देशात, बीटा व्हेरिएंट 119, गॅमा व्हेरिएंट 71 देशांमध्ये आढळला आहे.