Tarun Bharat

धारबांदोडा तालुक्यात 85.88 टक्के मतदान

Advertisements

सर्वाधिक साकोर्डात तर सर्वात कमी कुळे पंचायतीमध्ये

प्रतिनिधी /धारबांदोडा

धारबांदोडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत 85.88 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 88.78 टक्के साकोर्डा पंचायतीमध्ये तर सर्वात कमी 83.58 टक्के मतदान कुळे पंचायतीमध्ये झाले. तालुक्यीतल 41 प्रभागामध्ये ही निवडणूक घेण्यात आली. एकूण 124 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी शुक्रवार 12 रोजी धारबांदोडा येथील सरकारी संकुलात होणार आहे.

कुळे पंचायतीच्या प्रभाग 3 मध्ये सर्वाधिक 92.51 टक्के तर त्याच पंचायतीच्या प्रभाग 9 मध्ये सर्वात कमी 74.33 टक्के मतदान झाले आहे. कुळे पंचायतीमध्ये 83.58 टक्के, धारबांदोडा पंचायतीमध्ये 83.33 टक्के, दाभाळ-किर्लपाल पंचायतीमध्ये 87.05 टक्के, मोले पंचायतीमध्ये 87.66 टक्के तर साकोर्डा पंचायतीमध्ये 88.78 टक्के मतदान झाले. एकंदरीत मतदान प्रक्रिया शांतते पार पडली. पावसामुळेही मतदानात फारसा व्यत्यय आला नाही.

Related Stories

पशुखाद्य दरवाढीप्रकरणी दुध उत्पादकांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Patil_p

स्वाध्याय परिवारातर्फे पणजीत रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा उत्सव

Amit Kulkarni

प्रो. फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाची विजयी सलामी;वेळसावर विजय

Amit Kulkarni

कोलव्यात एकास धमकी, कारची हानी

Amit Kulkarni

पिछाडीवरून मुंबई सिटीची विजयी झेप

Amit Kulkarni

केरी सातेरी आजोबा देवस्थानच्या गावकर समाजावर अन्याय होत असल्याचा दावा.

Omkar B
error: Content is protected !!