Tarun Bharat

सासष्टीत 33 पंचायतीतून 863 उमेदवार

Advertisements

प्रतिनिधी /मडगाव

सासष्टी तालुक्मयातील 33 ग्रामपंचायतींसाठी 863 उमेदवारांमध्ये आज चुरशीची लढत होत आहे. आज होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाही सक्रीय झाली आहे. सासष्टीतील नुवे, बेतालभाटी, वार्का, वेळळी, आकें-बायश, रूमडामळ या ग्रामपंचायतीमध्ये लक्षवेधी लढत होत आहे.

सासष्टी बऱयाच पंचायतीनी नव्या दमाचे उमेदवार निवडणुकीत उतरले असून त्यांनी प्रस्थापितासमोर आव्हान निर्माण केले आहे. नुवे पंचायतीत माजी आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांची पत्नी तर बेतालभाटी पंचायतीत माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या पत्नी निवडणुकीत उतरल्या आहेत. वार्कात माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. वेळळीत दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो यांच्या पत्नी निवडणूक लढवित आहे.

नावेली मतदारसंघातील आकें-बायश, रूमडामळ व दवर्ली पंचायतीत भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने विद्यमान आमदार उल्हास तुयेकर यांच्यासमोर पेच प्रसंग निर्माण करण्यात आला आहे. भाजपचेच कार्यकर्ते असलेले सत्यविजय नाईक व दामोदर नाईक यांनी आपले समर्थक देखील निवडणुकीत उभे केल्याने पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. आकें-बायश, दवर्ली-दिकरपाल व रूमडामळ या तीन पंचायतीत भाजपचे वर्चस्व आहे. आत्ता पंचायत निवडणुकीत भाजप आपले वर्चस्व सिद्ध करणार की नाही हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

कुंकळळी मतदारसंघात आमदार युरी आलेमाव यांनी देखील आपल्या समर्थकांना पाठिंबा दिलेला आहे. कुडतरी मतदारसंघात आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या समोर कडवे आव्हान आहे. आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हे भाजप सरकारला पाठिंबा देत असल्याने, त्यांना आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोरदार लढत द्यावी लागत आहे.

सासष्टीत 9 उमेदवार बिनविरोध

सासष्टी तालुक्मयातून या पूर्वीच 9 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात  अँजेला दौरादो (सुरावली प्रभाग 5), झेवियर वेन्सी परेरा (काना-बाणावली प्रभाग 8), दिलेश्वर नाईक (नागोवा प्रभाग 2), जोसेफिना रॉक फर्नांडिस (आंबेलीम प्रभाग 7), मिशेल डिसोझा (माकाझान वॉर्ड 6), सायमन फर्नांडिस (वेळळी वॉर्ड 6), एस्टरफिनो डायस (वॉर्ड 4), मारिया सिक्वेरा (वॉर्ड 5) आणि हिपोलिटो डायस (वॉर्ड 6), हे सर्व चांदोर-काव्होरिम ग्रामपंचायतीचे आहेत.

Related Stories

विठ्ठलदास पै काकोडे यांचे निधन

Amit Kulkarni

साळगावकरचे चर्चिलवर ‘पंचतारांकित’ गोल; स्टिफनची हॅट्ट्रिक

Amit Kulkarni

राज्यात ‘किंग मोमो’ची राजवट

Patil_p

नारायण नाईक यांच्यावरील आरोप हल्ला प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराला पाठीशी घालण्यासाठी, सुत्रधाराकडून प्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न, संशयीत व्यवहारांची चौकशी व्हावी – तुळशिदास नाईक

Amit Kulkarni

सत्तरी उपजिल्हाधिकाऱयाकडून तीनजण दोषी

Patil_p

शिक्षण क्षेत्रात भाऊसाहेबांच्या स्वप्नांना ठेच पोचविण्याचे प्रयत्न : ढवळीकर

Amit Kulkarni
error: Content is protected !!