87 hatchlings of the first hatchling were released into the marine natural habitat at Wayangani
कासव विणीच्या नवीन हंगामात वेंगुर्ले तालुक्यात 74 घरटी संरक्षित
वेंगुर्ले तालुक्यामधील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या विणीचा हंगाम चालू असून आजपर्यंत 74 घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यातील वायंगणी-साळगांवकरवाडी येथील प्रकाश नारायण साळगांवकर यांनी दि. 12 डिसेंबर रोजी नवीन हंगामातील पहिले समुद्री कासव ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांचे घरटे संरक्षीत केले होते. त्यातून गुरुवार दि. 2 फेब्रुवारी रोजी 87 पिल्ले घरट्यातून बाहेर आली. सदर पिल्लेकुडाळ येथील वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आली.
या प्रसंगी प्रकाश साळगांवकर, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सुर्यकांत सावंत, मठ वनसेवक शंकर पाडावे, अमित रोकडे आणि वेंगुर्लेतील प्रकल्प समन्वयक दिगंबर तोरस्कर आदी उपस्थित होते.यावर्षी सावंतवाडी वनविभागामार्फत सावंतवाडीतील उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील समुद्र किनारी समुद्री कासवांच्या घरट्यांचे संरक्षण करण्याचे काम चालू आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)