Tarun Bharat

मुस्लिम बांधवांनी घरातच ईद साजरी करावी; यंदा जुलूस निघणार नाही

सोलापूर / प्रतिनिधी

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उद्या 30 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. मात्र यंदा सोलापूर शहर, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे  सालाबाद प्रमाणे साजरे होणारे मोठे कार्यक्रम रद्द करून ही जयंती  साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय जशने ईद-ए- मिलादुन्नबी जुलूस कमिटीने  घेतला आहे. दरम्यान मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर गर्दी न करता घरातच फातेहा पडून साधेपणाने ईद-ए-मिलादुन्नबी ईद साजरी करावी, मास्क , सोशल डिस्टेंसचे पालन करावे असे आवाहन कार्याध्यक्ष मकबूल मोहोळकर यांनी केले आहे.

दरवर्षी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त  जुलूस कमिटीच्या वतीने सोलापुरातील विजापूर वेस येथे मोठी शोभायात्रा काढण्यात येेत असते तसेच विविध धार्मिक कार्यक्रम, बांधवांना शरबत, खीर, महाप्रसाद वाटप करण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी् कोरोना महामारीमुळे जुलूस न काढण्याचा व मोठे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय कमिटीने घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी यंदाची ईद घरातच साध्यापणाने साजरी करावी. रस्त्यावर गर्दी न करू नये असेही आवाहन मोहोळकर यांनी केले आहे. 

Related Stories

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

Archana Banage

पुण्यात महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची बाधा; 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

‘कोविशील्ड’ लस आज सोलापुरात दाखल होणार

Archana Banage

गृहमंत्र्यांवर शिवसेना नाराज ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून वृत्ताचे खंडन

Archana Banage

ईडीने चौकशी केलेल्या कंपनीकडून सोमय्यांच्या संस्थेला निधी; संजय राऊतांचा आरोप

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागाला दिलासा

Archana Banage