Tarun Bharat

डिचोली तालुक्यात 89.27 टक्के मतदान

Advertisements

लाटंबार्से येथील घटना वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत : सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त

प्रतिनिधी /डिचोली

डिचोली तालुक्मयातील 17 पंचायतींसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेला तालुक्मयातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 89.27 टक्के मतदान केले. निवडणुकीत स्थानिक पातळीवरील आपला नेता निवडण्यासाठी लोकांनी यावेळी उत्तम प्रतिसाद दिल्याचे एकंदरीत मतदान प्रक्रियेवरून दिसून आले.

डिचोली तालुक्मयात सर्व पंचायतींमध्ये मतदारांचा मतदानासाठी मोठा प्रतिसाद दिसून आला. पुरुषांबरोबरच महिला मतदार, तसेच युवा मतदारांनी चांगला उत्साह दाखविला. उमेदवारांपैकी बरेच उमेदवार युवा असल्याने युवा मतदारांनी चांगले मतदान केले. सर्व पंचायतींमध्ये मतदानाची टक्केवारी 80 टक्क्मयांच्या वरच आहे.

लाटंबार्से पंचायतीत 91.42 टक्के मतदान झाले. एकूण 4988 पैकी 4560 मतदारांनी मतदान केले. 2464 पैकी 2271 पुरुष तर 2524 पैकी 2289 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 9 प्रभाग आहेत.

नार्वे पंचायतीत 90.62 टक्के मतदान झाले. एकूण 1599 पैकी 1449 मतदारांनी मतदान केले. 780 पैकी 720 पुरुष तर 819 पैकी 729 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 5 प्रभाग आहेत.

वन म्हावळींगे कुडचिरे पंचायतीत 89.69 टक्के मतदान झाले. एकूण 2843 पैकी 2550 मतदारांनी मतदान केले. 1405 पैकी 1295 पुरुष तर 1438 पैकी 1255 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 7 प्रभाग आहेत. प्रभाग क्र. 7 मध्ये बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे.

  मुळगाव पंचायतीत 88.46 टक्के मतदान झाले. एकूण 3240 पैकी 2866 मतदारांनी मतदान केले. 1595 पैकी 1401 पुरुष तर 1646 पैकी 1465 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 7 प्रभाग आहेत.

अडवलपाल पंचायतीत 91.40 टक्के मतदान झाले. एकूण 1023 पैकी 935 मतदारांनी मतदान केले. 502 पैकी 461 पुरुष तर 521 पैकी 474 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 5 प्रभाग आहेत.

मये वायंगिणी पंचायतीत 88.95 टक्के मतदान झाले. एकूण 6678 पैकी 5940 मतदारांनी मतदान केले. 3262 पैकी 2908 पुरुष तर 3416 पैकी 3032 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 11 प्रभाग आहेत. प्रभाग क्र. 11 मध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे.

मेणकुरे धुमासे पंचायतीत 90.23 टक्के मतदान झाले. एकूण 1586 पैकी 1431 मतदारांनी मतदान केले. 813 पैकी 729 पुरुष तर 773 पैकी 702 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 5 प्रभाग आहेत.

शिरगाव पंचायतीत 85.86 टक्के मतदान झाले. एकूण 1464 पैकी 1257 मतदारांनी मतदान केले. 731 पैकी 630 पुरुष तर 733 पैकी 627 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 5 प्रभाग आहेत.

साळ पंचायतीत 89.37 टक्के मतदान झाले. एकूण 3160 पैकी 2824 मतदारांनी मतदान केले. 1590 पैकी 1397 पुरुषांनी तर 1570 पैकी 1427 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 7 प्रभाग आहेत.

पिळगाव पंचायतीत 88.51 टक्के मतदान झाले. एकूण 2027 पैकी 1794 मतदारांनी मतदान केले. 960 पैकी 860 पुरुष तर 1067 पैकी 934 महिलांनी मतदान केले. या पंचायतीत एकूण 7 प्रभाग आहेत. या पंचायतीतील प्रभाग क्र. 3 मधील उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

लाटंबार्से-सवरधाट येथे दोन गटांत वादाचा प्रकार

तालुक्मयातील सर्व ठिकणी शांततेत व सुरळीतपणे निवडणुका पार पडल्या. लाटंबार्से पंचायतीच्या एका प्रभागात सावरधाट येथे दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये भांडण झाल्याची घटना घडली. एका समर्थकाने दुसऱया उमेदवाराच्या समर्थकाचा मोबाईल हिसकावत त्याला मारहाण केली. याबाबत पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Related Stories

विकासाच्या प्रकल्पांपेक्षा आरोग्य सुविधांवर जादा खर्च करा

Omkar B

वास्कोत सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा, दाटीवाटीने खरेदी विक्री

Omkar B

पडीक जमिनी ताब्यात घेऊन सामूहिक तत्त्वावर शेती करा

Amit Kulkarni

बेळगाव पोलिसांकडून मडगावात अटक

Omkar B

काँग्रेसही निवडणूक तयारीला

Amit Kulkarni

कुळे-शिगांव येथे सुसज्ज मैदान उभारणार-आमदार गणेश गावकर

Amit Kulkarni
error: Content is protected !!