औषध क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ असल्याचा दावा
मुंबई : देशातील औषध क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ येत्या 9 नोव्हेंबर रोजी सादर करण्यात येणार आहे. ग्लँड फार्माचा इश्यू 9 रोजी प्रारंभ होऊन 11 नोव्हेंबरला बंद होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनीने आयपीओसाठी 1,490-1,500 रुपयांचा भाव निश्चित केला आहे. आयपीओच्या वरचा भाव म्हणजे 1,500 रुपयांच्या आधारावर कंपनी 6,479 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. आयपीओसाठी लिड मॅनेजरमध्ये सिटी, नोमुरा आणि कोटक महिंद्रा बँक आहे. ऑफर फॉर सेल(ओएफएस) च्या आधारे 3.48 कोटी समभागांची विक्री करण्यात येणार आहे.
तीन वर्षानंतर औषध कंपनीचा पहिला आयपीओ
चालू वर्षात आतापर्यंत बाजारामध्ये कोणत्याही नवीन औषध कंपन्यांचे लिस्टिंग करण्यात आलेले नाही. औषध कंपनीचा शेवटचा आयपीओ 2017 मध्ये आला होता.