ब्राझीलमधील युवकाचा अजब प्रताप, एक पत्नी घटस्फोट घेण्याच्या तयारीत
एक युवकाने 9 विवाह केले असून त्याच्या या सर्व पत्नींसोबत तो राहत आहे. या युवकाचे नाव आर्थर ओ उरसो असून तो पेशाने मॉडेल आहे. आर्थर ब्राझीलचा नागरिक आहे. मागील वर्षी त्याने एकाचवेळी 9 महिलांसाब्sात विवाह केला होता, यामुळे तो चर्चेत आला होता. या प्रकाराला त्याने ‘फ्री लव्ह सेलिब्रेशन’ ठरविले होते. आर्थरची एक पत्नी आता घटस्फोट घेऊ पाहत आहे.
आर्थरने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये एका चर्चमध्ये विवाह केला होता. त्याने कॅथोलिक पद्धतीने 9 महिलांसोबत विवाह केला होता. एक विवाह पद्धतीला विरोध दर्शविण्यासाठी हे केल्याचे त्याचे म्हणणे होते. आर्थरच्या या कृतीने देश नव्हे तर जगभरात प्रसिद्धी मिळविली होती.
आर्थरच्या एका पत्नीने घटस्फोट देणार असल्याचे म्हटले आहे. बहुविवाहात आता माझा विश्वास राहिलेला नाही असे अगाथा या त्याच्या पत्नीने म्हटले आहे. अगाथाला नेहमीच मी हवा असतो, परंतु हे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण आर्थरने दिले आहे. माझ्या अन्य पत्नींना अगाथाचा स्वभाव योग्य नसल्याचे वाटते, एका पत्नीला मी गमावल्याचे कळले आहे असे त्याने म्हटले आहे.