प्रतिनिधी/चंदगड
जिल्हा परिषद बांधकाम विभागा मार्फत चंदगड तालुक्मयात पूर्ण केले शासकीय कामाचे वर्क डन सर्टिफिकेट देणेसाठी 9 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग चंदगडचे उपअभियंता प्रमोद गोपाळराव कुलकर्णी (वय 58, रा. नवीन वसाहत, चंदगड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर, मूळ गाव – कणगला, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत 28 वषीय युवकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोहेकॉ मनोज खोत, चापोहेकॉ सुरज अपराध, पोना नवनाथ कदम, पोना विकास माने, पोकॉ मयूर देसाई यांनी केली.
यापुढे कोणत्याही कामात कमिशन मागून खड्ड्यात रस्ता घातल्यास अशा अधिकाऱयांना फटके दिल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही.– अनिल तळगुळकर