इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकव्याप्त काश्मीरमध्ये रविवारी लष्कराचे एक वाहन दरीत कोसळले. या अपघातात 9 जवानांचा मृत्यू झाला आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शौजाबाद परिसरात हा अपघात झाला. पाकिस्तानी लष्कराचे अनेक ट्रक मांग बजरी भागाकडे जात होते. यादरम्यान एक ट्रक नागमोडी वळणावरून दरीत कोसळला. पावसामुळे मार्ग पाणी साचून निसरडा झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती देण्यात आली. या अपघातात 9 पाकिस्तानी जवानांना प्राण गमावावे लागले. अपघातानंतर लष्कराकडूनच मदत व बचावकार्य राबविण्यात आले.