Tarun Bharat

पेडणेत मंगळवारी 9 अर्ज दाखल

पंचायत निवडणुकीत प्रस्थापितांचे पत्ते कट : मांद्रे मतदारसंघांत जीत आरोलकर समर्थकांत नाराजी

प्रतिनिधी /पेडणे

पेडणे तालुक्मयातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱया दिवशी एकूण 9 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, काही प्रभागात आरक्षणामुळे प्रस्थापितांचे मनसुबे उधळल्याने सर्वच पंचायतक्षेत्रात नारजीचा सूर आहे.

  पेडणे तालुक्मयात पंचायत निवडणुकांसाठी दुसऱया दिवशी 9 उमदेवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये आगरवाडा पंचायत क्षेत्रामधून प्रभाग क्र. 5मधून भगीरथ गावकर आणि सुरज गावकर यांनी दोन उमेदवारी अर्ज सादर केले. तर मोरजी पंचायत क्षेत्रामधून प्रभाग क्र. 1 मधून अर्जुन कृष्णा शेटगावकर, प्रभाग क्र. 7 मधून वीरजींना फर्नांडिस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मांदे प्रभाग 1 मधून अमित अंकुश सावंत यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.

  हरमल पंचायत क्षेत्रामधून प्रभाग क्र. 7मधून कुणाल ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोरगाव पंचायत क्षेत्रामधून प्रभाग क्र 1मधून  माजी जि. पं. सदस्य सुविधा कोरगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर धारगळ प्रभाग क्रमांक 1 मधून अमिता श्रीकृष्ण हरमलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

अनेकांचे पत्ते कट

 पंचायत निवडणुकीत  अनेक ठिकाणी राखीव प्रभागांचा घोळ निर्माण झाल्यामुळे विद्यमान पंच, उपसरपंचांचे एक प्रकारे पंखच छाटले आहे. यामुळे पेडणे तालुक्मयातील एकूण 17 ही पंचायत क्षेत्रातील नागरिकांतून सरकारच्या या आरक्षण प्रक्रियेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 पेडणे मतदारसंघातील पंचायतीचे प्रभाग काही जाणीवपूर्वक राखीव करून पत्ता कट केल्याचा आरोप काहीजणांकडून होत आहे. दरम्यान, आपण कुठल्याही प्रकारे पंचायत प्रभाग रचनेत ढवळाढवळ केली नसल्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी स्पष्ट केले.

जीत आरोलकर समर्थकांत नाराजी

  मांदे  मतदारसंघातील आमदार जीत आरोलकर यांचे समर्थक सरपंच, उपसरपंच, पंच यांचे प्रभाग महिला आणि अन्य वर्गासाठी राखीव झाल्याने सध्या जीत आरोलकर यांचे समर्थकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Related Stories

गणेशभक्तांवर ‘दृष्टी’ ठेवणार लक्ष!

Omkar B

संस्काराचे बिज पेरणाऱया कीर्तनाला राजाश्रय मिळण्याची गरज

Patil_p

कंत्राटी परिचारिकांची निदर्शने

Amit Kulkarni

भाजपने पाठीत खंजीर खुपसल्यास पत्ते खोलणार

Amit Kulkarni

’जेथे आपण, तेथे योग’ संकल्पनेवर यंदा योग दिवस

Amit Kulkarni

मुरगाव पालिकेचे कामगार वेतनासासाठी पुन्हा संपावर

Amit Kulkarni