Tarun Bharat

9 फूट 6 इंच उंचीचा व्यक्ती

अजून उंची वाढत असल्याचा करतोय दावा

आफ्रिकेतील देश घानामध्ये राहणारा एक व्यक्ती जगातील सर्वात उंच व्यक्ती ठरू शकतो. 29 वर्षीय सुलेमान अब्दुल सालेद असे या व्यक्तीचे नाव आहे. सुलेमानची उंची 9 फूट 6 इंचापर्यंत पोहोचली आहे. जगातील सर्वात उंच व्यक्तीचा विक्रम 8 फूट 2 इंच असलेल्या व्यक्तीच्या नावावर आहे. तुर्कियेत राहणाऱया सुल्तान कोसेन यांच्या नावावर सध्या हा विक्रम आहे.

तर दुसरीकडे घानामधील सुलेमान अद्याप आपली उ&ची वाढत असल्याचे सांगत आहे. जर तुम्ही मला 3-4 महिन्यांनी पाहिले तर माझी उंची वाढल्याचे दिसून येईल असे त्याचे सांगणे आहे. सुलेमान काही वर्षांपूर्वी गिगॅनटिजम नावाच्या आजाराने पीडित झाला होता, यामुळे त्याची उंची गरजेपेक्षा अधिक वाढत चालली आहे. याचमुळे त्याला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सुलेमान दर महिन्याला डॉक्टरकडे जात आहे. रुग्णालयातील नर्सने त्याची उंची मोजल्यावर ती दंगच झाली. मोजपट्टीपेक्षाही अधिक तुझी उंची झाल्याचे नर्सने सुलेमानला सांगितले आहे. तर सुलेमानची उंची अजून वाढत असल्याचे पाहून डॉक्टरही चकित झाले आहेत.

सुलेमानची उंची मोजत असताना नर्सला समस्येला सामोरे जावे लागल्याने तिने सहकाऱयाला मदतीसाठी बोलाविले. त्यालाही नीटपणे उंची मोजणे शक्य न झाल्याने डॉक्टर आणि अन्य नर्सला पाचारण करण्यात आले होते. माझी उंची आता परिसरातील अन्य घरांपेक्षाही अधिक झाली आहे. घरांच्या भिंतीपेक्षाही तो उंच झाल्याने त्याला समस्येला सामोरे जावे लागत आहे.

सुलेमान पूर्वी राजधानी अक्करा येथे राहत होता. एक दिवस त्याला जीभेचा आकार खूपच वाढल्याचे आढळून आले तसेच त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. काही काळानंतर त्याला केवळ जीभच नव्हे तर शरीराचा प्रत्येक हिस्सा वाढत असल्याची जाणीव झाली. सुलेमानला मारफान सिंड्रोम असून यामुळे त्याच्या कण्याचे हाड वाकडे होते आहे. हा आनुवांशिक आजार असून यामुळे शरीराच्या कनेक्टिव्ह टिश्यूजवर प्रभाव पडतो. यामुळे शरीराचे अवयव असामान्य स्वरुपात वाढू लागतात. अवयवयांचा आकार वाढण्यापासून रोखण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागणार आहे, पंतु घानामधील सार्वजनिक आरोग्य विमा त्याच्या आजाराला कव्हर करत नसल्याने त्याच्यासमोर समस्या उभी ठाकली आहे.

Related Stories

अफगाण तुरुंगावर आत्मघातकी हल्ला; 29 ठार

datta jadhav

हिंसा न थांबल्यास सैन्य तैनात करू

Patil_p

उइगूर मुस्लिमांना झिडकारणार तुर्कस्तान

Patil_p

बैरुतमधील महास्फोटात 100 जणांचा मृत्यू

Patil_p

दिग्गज सीईओंना मागे टाकत वेतन कमाईत महिला सीईओ अव्वल

Patil_p

जपानचे पंतप्रधान भारतातून थेट युक्रेन दौऱयावर

Patil_p