Tarun Bharat

लखनौमध्ये भिंत कोसळून 9 मजुरांचा मृत्यू

Advertisements

लखनौ / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात शुक्रवारी पहाटे तीन वाजता लखनौमध्ये मोठी दुर्घटना घडली. येथील दिलकुशा कॉलनीत भिंत कोसळल्याने 9 जणांचा चिरडून मृत्यू झाला. सर्व मृत आणि जखमी झाशी जिह्यातील पाचवाडा येथील रहिवासी आहेत. दोन जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हाधिकारी सूर्यपाल गंगवार यांनी सांगितले.

झाशी येथील काही मजूर कुटुंबीय कॅन्टोनमेंट परिसरातील आर्मी कॅम्पसच्या जुन्या भिंतीलगत एका झोपडीत राहत होते. येथेच नवीन सीमा भिंत बांधण्याचे काम करत असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झोपडीलगतची भिंत कोसळून 9 जणांना प्राण गमवावे लागले. दुर्घटनेवेळी झोपडीत लोक झोपले होते, अशी माहिती प्राथमिक तपासाअंती प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Stories

हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा!

Tousif Mujawar

कोरोना व्हायरस संक्रमणाच्या चाचण्या मोफत करा : सर्वोच्च न्यायालयाची सूचना

prashant_c

ट्रिपल सीट बाईक चालविण्याची अनुमती देऊ

Patil_p

देशात नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

Archana Banage

बँकांमधील निष्क्रिय खात्यांत 26 हजार कोटी रुपये पडून

datta jadhav

शिक्षक ते ‘लखपती’ शेतकरी

Patil_p
error: Content is protected !!