प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांप्रमाणेच जिल्हय़ातील वेगवेगळय़ा ठिकाणी चोऱया, घरफोडय़ा, दरोडय़ाचे प्रकार सुरूच आहेत. सौंदत्ती येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 9 लाखाचा ऐवज पळविला आहे. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली आहे.
शांतीनगर, कोळ्ळार गल्ली येथील बाबू महादेवप्पा पासलकर यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. बाबू व त्यांचे कुटुंबीय घरात नसताना कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला आहे. तिजोरीतील 11 तोळे सोने व दोन लाख रुपये रोकड पळविली असून या घटनेने सौंदत्ती परिसरात खळबळ माजली आहे.
घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक करुणेश गौडा व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. दसरोत्सवानिमित्त नागरिक देवदर्शनासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी जात आहेत. याचाच फायदा घेत चोरटय़ांनी बंद घरांना आपले लक्ष्य बनविले आहे.
सौंदत्तीप्रमाणेच खानापूर तालुक्मयातही चोऱयांच्या घटना वाढल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी चोरटय़ांच्या मुसक्मया आवळण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्या असून या चोऱयांमागे कोणती टोळी कार्यरत आहे, याचा तपास करण्यात येत आहे.