Tarun Bharat

परीक्षा घोटाळाप्रकरणी 9 जणांना अटक

Advertisements

धागेदोरे गोकाकपासून गदगपर्यंत : पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांची माहिती : एकूण 55 परीक्षा केंद्र

प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटक वीज प्रसरण निगम नियमितमध्ये रिक्त असलेल्या ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी 15 दिवसांपूर्वी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाला असून पीएसआय भरती परीक्षा घोटाळय़ापाठोपाठ घडलेल्या या प्रकाराची बेळगाव पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली.

सोमवारी पोलीस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना पोलीस प्रमुखांनी परीक्षा घोटाळय़ासंबंधीची सविस्तर माहिती दिली. 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत बेळगाव शहरातील 19, बैलहोंगल येथील 4, खानापूर येथील 3, रामदुर्ग येथील 4, सौंदत्ती येथील 4, चिकोडी येथील 8, गोकाक येथील 5, अथणी येथील 4, रायबाग येथल 4 अशा एकूण 55 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.

गोकाक येथील जेएसएस पदवीपूर्व कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर सिद्धाप्पा मदलिहाळ (वय 23, रा. नागनूर, ता. मुडलगी) या तरुणाने स्मार्टवॉचचा वापर करून प्रश्नपत्रिकेचा फोटो आपल्या मित्राला पाठविला होता. यासाठी टेलिग्रॅम ऍपचा वापर करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गोकाक पोलीस स्थानकात भा.दं.वि. 406, 417, 420, 426, 116 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अटकेनंतर प्रकरणाचा उलगडा

10 ऑगस्ट रोजी सिद्धाप्पा मदलिहाळ याला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे गदगपर्यंत पोहोचले असून पोलिसांनी एकूण 9 जणांना अटक केली आहे. सिद्धाप्पासह सुनील भंगी (वय 20, रा. मालदिन्नी, ता. गोकाक), बसवाणी डोणवाड (वय 55, रा. शिरहट्टी बी.के., ता. हुक्केरी), सिद्धाप्पा कोत्तल (वय 35, रा. बेनचिनमर्डी, ता. गोकाक), संतोष मानगावी (वय 21, रा. बिनगड्डी, ता. गोकाक), रेणुका जवारी (वय 21, रा. मालदिन्नी, ता. गोकाक), अमरेश राजूर (वय 55, रा. बेटगेरी, ता. गदग), मारुती सोनवणे (वय 57, रा. मीरापूर, ता. चिकोडी), सुमीतकुमार सोनवणे (वय 28, रा. मीरापूर, ता. चिकोडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

प्रश्नपत्रिका फुटीचे गदग परीक्षा केंद्र

शिरहट्टी बी.के. (ता. हुक्केरी) येथील फार्महाऊसवर बसून बसवाणी डोणवाड याने फोनवरून उत्तरे दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कोणत्या परीक्षा केंद्रांतून प्रश्नपत्रिका फुटली याची पोलिसांनी चौकशी केली असता गदग येथील नगरपालिकेच्या पदवीपूर्व कॉलेजमधून ते फुटल्याचे आढळून आले. त्यामुळे उपप्राचार्य व प्राचार्याच्या मुलालाही सुपरवायझरसह अटक करण्यात आली आहे.

जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक वीरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी उपस्थित होते. परीक्षा कोणत्याही असोत गोकाक तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात घोटाळे घडतात. यापूर्वी पोलीस भरतीसाठी झालेल्या परीक्षेतही गोकाक, मुडलगी तालुक्मयांतील अनेकांची धरपकड झाली आहे.

Related Stories

कॅन्टोन्मेंट कार्यालय अद्यापही नागरिकांसाठी लॉकडाऊनच

Patil_p

रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान बेळगावात

Omkar B

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उद्यापासून

Amit Kulkarni

खबरदारी म्हणून विजयनगर येथील तरुणाला अटक

Patil_p

धारदार शस्त्राने महिलेचा खून

Patil_p

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा बचावला पण आई दगावली..!

Nilkanth Sonar
error: Content is protected !!